बसने गाईला चिरडले, बसच्या मधोमध फसली गाय, क्रेनच्या सहाय्याने काढले बाहेर
प्रशांत चंदनखेडे वणी
राज्य परिवहन महामंडळाच्या बसने गोवंश जनावराला चिरडले. एवढेच नाही तर गोवंश जनावर बसच्या मधोमध फसले. त्यामुळे गोवंशाला बाहेर काढण्याकरिता मोठी कसरत करावी लागली. क्रेनच्या सहाय्याने बसाखली अडकलेल्या गोवंश जनावराला बाहेर काढावे लागले. या अपघातात गोवंश जनावर मृत्युमुखी पडले असून एसटी बस दुर्घटनाग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावली. ही घटना शुक्रवार दि. २१ फेब्रुवारीला सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास शहरालगत असलेल्या लालगुडा गावाजवळ घडली.
वणी वरून घुग्गुस मार्गे चंद्रपूर जाणाऱ्या बसची (MH 49 BZ 4186) गोवंश जनावराला धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, गोवंश जनावर (गाय) अक्षरशः बसखली चिरडल्या गेले. एवढेच नाही तर ते बसच्या मधोमध फसले. सुदैवाने प्रवाशांनी भरलेली ही बस अपघातग्रस्त होण्यापासून बचावली. बसखाली अडकलेल्या गाईला बाहेर काढण्याकरिता मोठी कसरत करावी लागली. लालगुडा गावातील नागरिकांनीही चालक व वाहकाला गाईला बाहेर काढण्याकरिता आवश्यक ती सर्व मदत केली. शेवटी क्रेनच्या सहाय्याने गाईला बाहेर काढण्यात आले. मात्र मोकाट जनावरांमुळे मुख्य मार्गांवर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
Comments
Post a Comment