रंग उधळा आणि पोटभरून हसा, खळखळून हसविणारं हास्य कवी सम्मेलन आहे धुळवडीला
प्रशांत चंदनखेडे वणी
बुरा ना मनो होली है, म्हणत एकमेकांवर आनंदाने रंगाची उधळण करणारा सण म्हणजे होळी. आपसी मतभेद, वैर आणि कटुत्व विसरून मानवी मनात आनंदाचे रंग भरणारा हा सण आहे. आपापसातील मनमूटाव दूर सारून एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना रंग लावून एकमेकांप्रती असणारा राग दूर करणारा सण म्हणजे होळी. होळी हा सण संपूर्ण भारतात आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो. स्नेहसंबंधी, शेजारी, मित्रमंडळ व परिसरातील लोक एकमेकांना रंग लावून होळी हा सण साजरा करतात. कुटुंबातील सदस्यही एकमेकांवर रंग उधळून हा सण साजरा करतात. नाते व आपसी संबंध घट्ट करणारा हा सण आहे. असे असले तरी आनंदाच्या रंगात हास्याची उधळण करण्याची परंपरा वणी शहराने जपली आहे. दिवसभर रंग उधळून आनंद साजरा करणाऱ्या शहरवासीयांचे चेहरे सायंकाळीही प्रफ्फुल्लीत राहावे म्हणून हास्याचे फुलोरे फुलविणारा कार्यक्रम दरवर्षी धुळवडीला आयोजित केला जातो. अखिल भारतीय अति दीड शहाणे सम्मेलन समिती वणीच्या विद्यमाने हास्याचे रंग उधळणारं हास्य कवी सम्मेलन मागील २५ वर्षांपासून शहरात आयोजित केलं जात आहे. या कवी सम्मेलनात दरवर्षी नवनवीन हास्य सम्राटांना आमंत्रित केलं जातं. यावर्षी आमंत्रित करण्यात आलेले प्रसिद्ध अतरंगी विनोदवीर शहरवासीयांना खळखळून हसविणार आहेत.
अखिल भारतीय अति दीड शहाणे सम्मेलन समिती कोरोना काळ सोडला तर दरवर्षी धुळवडीला हास्य कवी सम्मेलनाचं आयोजन करते. शहरात सिल्व्हर जुबली ठरलेलं हे हास्य कवी सम्मेलन शहरातील एक परंपरा बनू लागलं आहे. धुळवडीच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता भव्य शासकीय मैदानावर या कवी सम्मेलनाचं आयोजन केलं जातं. सुप्रसीध्द हास्य कवी या कवी सम्मेलनात आमंत्रित केले जातात. जे शहरवासीयांना खळखळून हसवितात. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धुरंधर व्यक्तींचा समावेश असलेली अति दीड शहाणे सम्मेलन समिती नियोजनबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करते.
नाव अति दीड शहाणे समिती असलं तरी त्या त्या क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींची ही समिती आहे. दिग्गज राजकारणी राजकारण बाजूला सारून एकोप्याने हा कार्यक्रम आयोजित करतात. राजकारणातील टोकाचे विरोधक असलेले राजकीय नेते या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मंचावर येतात. विरोधकांची भूमिका बाजूला ठेऊन परंपरा जोपासण्याला प्राथमिकता देतात. आणि म्हणूनच होळी हा सण वैऱ्यांमध्येही सलोखा निर्माण करणारा सण असल्याचे म्हटले जाते. सर्व रुसवे फुगवे सोडून आनंदाने एकमेकांना रंग लावून संस्कृतीचं जतन करणारा हा सण असून होळी या सणाला खळखळून हसविण्याची जबादारी अ.भा. अति दीड शहाणे (प्रभावशाली व्यक्तींचा भरणा असलेली) समिती वणी यांनी घेतली आहे. यानिमित्ताने त्या काळात गाजलेल्या एका चित्रपटातील गीतांच्या ओळी सहज ओठावर येतात, "होली के दिन दिल खील जाते है रंगोमे रंग मिल जाते है, गिले शिकवे भुलके दोस्तो ,दुश्मन भी गले मिल जाते है".
Comments
Post a Comment