धुळवडीच्या दिवशी दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी 

मोटारसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील नायगाव व बेलोरा फाट्यादरम्यान घडली. विवेक शर्मा वय अंदाजे ३१ वर्षे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 

वेकोलिच्या निलजई कोळसाखाणीत ओबी उत्खनन करणाऱ्या सायडेक्स कंपनीत ट्रक (व्होल्वो) चालक म्हणून कामाला असलेला हा युवक परप्रांतीय असून तो बिहार राज्यातील रहिवाशी असल्याचे समजते. सध्या तो घुग्गुस येथे राहत होता. १४ मार्चला धुळवडीच्या दिवशी मोटारसायकलने घुग्गुस-चारगाव चौकी मार्गाने जात असतांना नायगाव जवळ त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले, व दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात दुचाकी चालक युवक हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र अपघातात गंभीर दुखापत झालेल्या या युवकाचा मृत्यू झाला. आज त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह अंतिमसंस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी