गुन्हेगारी प्रवृत्तीचा उधम, एकाला अटक करीत नाही तोच दुसरा चाकूचा धाक दाखवून माजवतो दहशत

प्रशांत चंदनखेडे वणी 

चाकूच्या धाकावर परिसरातील जनतेत दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हरीश राजू तोमस्कर (२९) रा. सेवानगर असे या आरोपीचे नाव आहे. ही कार्यवाही २४ मार्चला दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. 

आरोपी हरीश तोमस्कर हा कोंडेवार ले-आऊट परिसरातील कार्निवल बार समोर सार्वजनिक रस्त्यावर हातात चाकू घेऊन नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करीत होता. अशातच ही माहिती पोलिस स्टेशनला देण्यात आली. या माहिती वरून पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चाकूच्या धाकावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली. त्याच्या जवळून एक धारदार चाकू जप्त करण्यात आला. अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणाऱ्या हरीश तोमस्कर याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर, एपीआय धीरज गुल्हाने व पोलिस पथकाने केली. 

वणी गणेशपूर रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीवर याच दिवशी पोलिसांनी कार्यवाही केल्याचे समजते. गणेशपूर पुलाजवळ अवैध दारू विक्रीचा अड्डा थाटून राजरोसपणे दारू विक्री करणाऱ्या अवैध दारू विकेत्यावर कार्यवाही करून पोलिसांनी दारू जप्त केल्याचे सांगण्यात येते. उत्पादन शुल्क विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने अवैध दारू विक्रीला शहरासह तालुक्यात उधाण आलं आहे. तर पोलिसांचा वचक न राहिल्याने अपराधीक घडामोडी वाढू लागल्या आहेत. प्रेमनगर वस्तीत खुल्ला चाकू हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्या आरोपीला अटक केल्याची घटना ताजी असतांनाच आणखी एका चाकूच्या धाकावर दहशत माजविणाऱ्या आरोपीने पोलिसांना आव्हान दिलं. यावरून गुन्हेगारी प्रवृत्ती बेलगाम झाल्याचे दिसून येत आहे. गणेशपूर पुलाजवळ पोलिसांनी अवैध दारू विकणाऱ्या आरोपीवर कार्यवाही केल्यानंतर याच दिवशी चाकूच्या धाकावर नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी