प्रशांत चंदनखेडे वणी
युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरालगत असलेल्या वागदरा येथे सोमवार दि. ३ मार्चला दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजू ठाकरे वय अंदाजे ४५ वर्षे असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. तो ट्रॅक्टरवर मजुरी करून आपली उपजीविका चालवायचा. घरात कुणी नसतांना त्याने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही.
वणी तालुक्यातील वागदरा येथे परिवारासह राहत असलेल्या राजू ठाकरे याने घराच्या खोलीत गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. मृतक राजू ठाकरे हा ट्रॅक्टरवर मजुरी करून आपला प्रपंच चालवायचा. तो दारूचा प्रचंड व्यसनी असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगा व पत्नी घरी नसल्याची संधी साधून त्याने घराच्या आड्याला गळफास लावला. कुटुंबातील सदस्य जेंव्हा घरी परतले तेंव्हा त्यांना राजू हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे कुटुंबीयांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली. कुटुंबीयांची आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नंतर गावातीलच व्यक्तींनी ही माहिती पोलिस स्टेशनला दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. राजू ठाकरे याच्या पश्च्यात पत्नी, दोन विवाहित मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून सतत होणाऱ्या आत्महत्यांनी चिंता निर्माण केली आहे. राजू ठाकरे याने नैराश्येतून आत्महत्या केली की, त्याच्या आत्महत्या करण्याला आणखी कुठले कारण आहे, याचा तपास पोलिस करीत आहे.
No comments: