प्रशांत चंदनखेडे वणी
शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये जप्तीत असलेल्या दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांसह लोखंडी भंगाराचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. ४ मार्चला शिरपूर पोलिस स्टेशनच्या आवारात ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावात सहभागी होण्याकरिता स्क्रॅब खरेदी विक्रीचा परवाना असणे आवश्यक आहे. स्क्रॅब मर्चंड लायसन्स धारकांनी लायसन्स व निविदेसह ४ मार्चला सकाळी ७ वाजता शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये येऊन आपल्या नावाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंतच लिलावासाठी निविदा स्वीकारण्यात येतील. लिलाव प्रक्रियेच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्यानंतरच लिलावात बोली लावता येणार आहे.
पोलिसांनी विविध गुन्हयात जप्त केलेली वाहने वाहनधारकांनी मूळ कागदपत्र सादर करून सोडवून न नेल्यास ती पोलिस स्टेशनमध्येच जमा राहते. कालांतराने ही वाहने जीर्ण होऊन त्यांचे भंगारात रूपांतर होते. जप्तीतील बेवारस वाहनांमुळे पोलिस स्टेशनचं आवार व्यापलं जात असल्याने या वाहनांचा एका कालावधी नंतर लिलाव करण्यात येतो. न्यायाधीश व उपविभागीय दंडाधिकारी यांची रीतसर परवानगी घेऊन पोलिस स्टेशनमध्ये या बेवारस वाहनांची बोली लावली जाते. शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्यात नोंद असलेल्या ३६ दुचाकी, १ चारचाकी व एका तीनचाकी वाहनासह एका लोखंडी भंगाराचा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने लिलाव करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कार्यवाही करून जप्त केलेली वाहने या गुन्ह्यांचा निकाल लागल्यानंतरही वाहनधारकांनी सोडवून न नेल्याने त्यांचाही न्यायालयाच्या आदेशाने लिलाव करण्यात येत आहे. मदका गुन्ह्यातील ३१ दुचाकी व ३ चारचाकी अशा एकूण ३४ वाहनांचा देखील या दिवशी लिलाव करण्यात येणार आहे. ४ मार्चला सकाळी ११ वाजता पासून शिरपूर पोलिस ठाण्यात वाहनांचा लिलाव सुरु होईल. लिलाव प्रक्रियेच्या सर्व अटी शर्ती पूर्ण करून लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनाच वाहनांच्या खरेदीसाठी बोली लावता येणार आहे. तहसीलदार निखिल धुळधर यांच्या अध्यक्षतेखाली व ठाणेदार माधव शिंदे आणि परिवहन अधिकारी यांच्या समिती समक्ष ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
No comments: