घृणास्पद घटना, अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर खिळली त्याची वासनांध नजर, अल्पवयीनाला पडला वयाचाही विसर
प्रशांत चंदनखेडे वणी
एका चार वर्षीय बालिकेवर १५ वर्षीय मुलाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची तक्रार मारेगाव पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. बालिकेला पाळीव जनावरांच्या गोठ्यात नेऊन या मुलाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारी वरून पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मारेगाव तालुक्यातील एका गावात २ मार्चला ही खळबळजनक घटना घडली.
टीव्ही वरील भडक मालिका, चित्रपटातील भडक दृश्ये व मोबाईलवरील अश्लील चित्रफीती पाहून कमी वयातच मुलांमध्ये वासनांध प्रवृत्ती निर्माण होऊ लागली आहे. इंटरनेटवर अश्लील रिल्स व व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलांच्या भावना व दृष्टिकोन बदलू लागला आहे. मुले मर्यादा ओलांडू लागले आहेत. आई वडील मजुरीला गेल्यानंतर घरी आजी सोबत असलेली ४ वर्षाची चिमुकली घराजवळ खेळत होती. घराजवळ खेळत असलेल्या ४ वर्षाच्या मुलीवर गावातीलच १५ वर्षीय मुलाची वाईट नजर पडली. त्याने तिला जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यात नेले. वयाचं भान हरपलेल्या या मुलाने चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात चिमुकलीचे आई वडील तिला शोधत गोठ्याजवळ पोहचल्याने तो तिथून निघून गेला. मात्र त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मुलीच्या आई वडिलांना संशय आला. त्यामुळे त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी मुलीला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले. आणि त्या मुलाने चिमुकली सोबत केलेल्या दुष्कृत्याबाबत तक्रार नोंदविली. मुली सोबत घडलेला प्रसंग अतिशय धक्कादायक होता. अवघ्या ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. चिमुकलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी या बालकावर बीएनएसच्या कलम ६५(२), ६४(२), ३(ब) व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मारेगाव तालुका हादरला आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
No comments: