Latest News

Latest News
Loading...

अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नामुळे अपघातग्रस्तांना मिळाली आर्थिक मदत

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते. एकाच्या हाताला तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना आधी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नंतर त्यांना पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले. दोघांचीही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना उपचाराचा खर्च पेलावणारा नव्हता. ही बाब युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना कळताच त्यांनी अपघातग्रस्तांची भेट घेत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. ट्रक मालक उपचाराचा खर्च उचलण्यास टाळाटाळ करीत असल्याचे अजिंक्य शेंडे यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ कोल वॉशरी येथे जाऊन व्यवस्थापकांशी चर्चा केली. कोल वॉशरी व्यवस्थापकांना जखमींची आर्थिक परिस्थिती समजावून सांगत त्यांना आर्थिक मदत देण्यास भाग पाडले. अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नामुळे अपघातग्रस्तांना उपचाराचा खर्च मिळाल्याने अपघातग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबियांमधून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

वणी येथील कामे आटपून दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या व्यक्तींच्या दुचाकीला कोळसा वाहतुकीच्या ट्रकने जोरदार धडक दिली. दुचाकी अक्षरशः ट्रकच्या चाकाखाली आली. सुदैवाने दुचाकीस्वारांचे प्राण वाचले. मात्र या अपघातात दोनही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. महादेव उपरे (४५) व महादेव मंगाम (५२) दोघेही रा. ब्राह्मणी अशी या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. दोघांचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना उपचाराचा खर्च पेलावणारा नव्हता. ही माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना मिळताच त्यांनी आपली सूत्र हलवून या दोघांनाही आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमधून समाधान व्यक्त होतांना दिसत आहे. 


No comments:

Powered by Blogger.