प्रशांत चंदनखेडे वणी
घराच्या बांधकामावरून वाद घालून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी व हातातील कडे मारून जखमी केल्याची घटना शहरातील भगतसिंग चौकातील इंगोले मेडिकल जवळ घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी एका महिलेसह तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील रंगनाथ नगर येथील रहिवाशी असलेल्या रविंद्र धनराज गुप्ता (३०) यांच्याशी विकास गजानन बोन्डे (२१) रा. जागृती नगर, प्रशांत मारोती गाडगे (४०) व एक महिला (६०) दोघेही रा. शास्त्री नगर यांनी घराच्या बांधकामावरून वाद घातला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. महिलेने रविंद्र गुप्ता यांना शिवीगाळ केली. तर विकास बोन्डे व प्रशांत गाडगे यांनी रविंद्र गुप्ता यांना लाथाबुक्य्यांनी मारहाण केली. या मारहाणीत विकास बोन्डे यांच्या हातातील कडे रविंद्र गुप्ता यांच्या डाव्या कानाजवळ लागल्याने ते जखमी झाले आहेत. कानाजवळ दुखापत होऊन त्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने रविंद्र गुप्ता यांनी झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी विकास बोन्डे, प्रशांत गाडगे व एका महिलेविरुद्ध बीएनएसच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२(२)(३), ३(५), नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: