Latest News

Latest News
Loading...

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला यवतमाळातूनही समर्थन, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविले निवेदन

प्रशांत चंदनखेडे वणी 

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनाशी संबंधित महत्वपूर्ण घटनांपैकी बुद्धगया हे एक स्थळ आहे. या स्थळावर काश्मिरी ब्राम्हणांनी धार्मिक अतिक्रमण केले. महाबोधी महाविहार अनेक वर्षांपासून त्यांच्या कब्जात आहे. ब्राम्हणांनी ताब्यात घेतलेले बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याकरिता सुरु असलेले आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात आले आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आता या आंदोलनाला गती देण्यात आली आहे. सर्वच स्तरातून बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनाला समर्थन मिळू लागले आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारा या आंदोलनाची हाक देण्यात आली असून संपूर्ण भारतातील ३१ राज्य व ५६५ जिल्ह्यांमध्ये हे देशव्यापी चरणबद्ध आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने यवतमाळ जिल्हा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठवून बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनाला समर्थन दर्शविण्यात आले आहे. 

बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खुंच्या ताब्यात देण्यात यावे, ही अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. मात्र काश्मिरी ब्राम्हण महाबोधी महाविहारावरील ताबा सोडायला तयार नाही. त्यांनी येथे धार्मिक अतिक्रमण केले आहे. त्यामुळे आता बुद्धिस्ट इंटरनॅशन नेटवर्कने आंदोलनाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुद्धगया मुक्ती आंदोलन संपूर्ण भारतात राबविले जाणार आहे. काश्मिरी ब्राह्मणांच्या ताब्यातून बुद्धगया मुक्त करण्याचा संकल्प करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. या आंदोलनाला संपूर्ण देशातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. यवतमाळ जिल्हा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनेही या आंदोलनाला समर्थन देण्यात आले आहे. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनिल वेले यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठवून आंदोलनाचे पहिले चरण पूर्ण केले आहे. 

आंदोलनाच्या पुढील चरणात ८ मार्चला धरणे प्रदर्शन करण्यात येणार असून २२ मार्चला रॅली प्रदर्शन करण्यात येणार आहे. ९ एप्रिलला जेलभरो आंदोलन करून बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनाची तीव्रता दर्शविण्यात येणार आहे. तर १ जुलैला भारत बंदची हाक देण्यात येणार आहे. महाबोधी महाविहार काश्मिरी ब्राह्मणांच्या कब्जातून मुक्त करण्याचं रणशिंग बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून फुंकण्यात आलं आहे. त्यामुळे बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात घ्यायचीच हा दृढ निश्चय करूनच आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. या आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, मौर्य क्रांती संघ, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ यांच्यासह विविध संघटनांनी जाहीर समर्थन दिले आहे. 

बुद्धगया महाबोधी महाविहाराचा इतिहास 

तथागत गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महत्वपूर्ण घटने पैकी बुद्धगया हे एक महत्वपूर्ण स्थळ आहे. सम्राट अशोकांनी ज्याला संबोधी संबोधले आहे. तथाकथित आजादी नंतर काश्मिरी ब्राह्मण महंतांनी या स्थळावर कब्जा केला. आणि हा कब्जा महंत ब्राह्मणांनी टेम्पल ऍक्ट 1950 हा कायदा बनवून केला. त्यामुळे महाबोधी महाविहाराचे मालक ब्राह्मण बनून आहेत. नऊ सदस्यांपैकी पाच सदस्य हे ब्राह्मण आहेत. हा नाजायज कब्जा हटवण्यासाठी हा एक कायदा रद्द करणे फार महत्त्वाचे आहे. जस्टीस मेक जेफ रसन यांनी जी. के. 1895 च्या महाबोधी महाविहारच्या विवादावर ऐतिहासिक सुनावणी दिली होती. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, महाबोधी महाविहार हे मुलता बौद्ध यांचे पवित्र स्थळ आहे. त्यावरील ब्राह्मणांचे नियंत्रण हटले पाहिजे. तरी सुद्धा ब्राह्मण महाबोधी बुद्ध विहार या वरील ताबा सोडायला तयार नाही. ब्राह्मणांच्या प्रेरणास्थळावर एससी, एसटी, ओबीसीचे प्रतिनिधित्व टाळल्या जाते. तर मग बौद्धांच्या प्रेरणास्थळावर ब्राह्मण महंतांचा कब्जा का म्हणून सहन करायचा, असा सूर बहुजन मूलनिवासी समाजातून उमटू लागला आहे. बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मण महंताच्या कब्जातून मुक्त करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण भारतात 31 राज्य व 565 जिल्ह्यांमध्ये हे देशव्यापी चरणबद्ध आंदोलन करण्यात येत आहे,

No comments:

Powered by Blogger.