राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव
प्रशांत चंदनखेडे वणी
स्वराज्य संस्थापक तथा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची तिथी नुसार जयंती साजरी करण्याकरिता राजूर कॉलरी येथे शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १७ मार्चला सायंकाळी ५ वाजता सावित्रीबाई फुले चौक राजूर येथे हा जयंती महोत्सव साजरा होणार आहे. युवासेना राजूर शाखा प्रमुख अमृत फुलझेले व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन राजूरच्या उपाध्यक्षा दिशा फुलझेले यांच्या पुढाकारातून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे.
या जयंती महोत्सवाचं उद्घाटन सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संघदीप भगत हे राहतील. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, ग्रा.प. सदस्य अमर तितरे, भिमटायगर सेना जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे, ग्रा.प. सदस्य ओम चिमुरकर, माजी सरपंच तथा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन राजूरच्या अध्यक्षा प्रणिता मोहम्मद असलम, ग्रा.प. सदस्य बबिता सिंह, ग्रा.प. सदस्य रेहाना सिद्दीकी यांची उपस्थिती राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात होईल. त्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्री ८ वाजता क्लासिकल डान्स (हिंगणघाट) व सुरसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. या भव्य स्वरूपात साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments
Post a Comment