प्रशांत चंदनखेडे वणी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. ९ मार्चला सकाळी १० वाजता नांदेपेरा मार्गावरील शांतीमाला हॉस्पिटल (डॉ. नगराळे) येथे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. गर्भाशय कॅन्सर व एचपीव्ही लस या संदर्भात या शिबिरात महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गर्भधारणेपूर्वीचा बिजसंस्कार विधी याविषयी देखील या शिबिरातून माहिती देण्यात येणार आहे.
या शिबिरात डॉ. संचिता विजय नगराळे (MBBS, MD, DGO, गोल्डमेडलिस्ट) व वैद्य सुवर्णा चरपे (श्री विश्व आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र वणी) यांचं स्त्रियांचे गंभीर आजार व त्याबद्दलची जागृती याबाबत मौलिक मार्गदर्शन होणार आहे. डॉ. संचिता विजय नगराळे या गर्भाशय कॅन्सर जागरूकता व एचपीव्ही लस याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर वैद्य सुवर्णा चरपे यांचं गर्भधारणेपूर्वीचा बिजसंस्कार विधी यावर मार्गदर्शन होणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सुदृढ आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्याच्या उदात्त हेतूने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे महिलांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
No comments: