Latest News

Latest News
Loading...

बसस्थानक येथे थंडगार पाण्याची पाणपोई सुरु, राजस्थानी महिला महामंडळाचा सेवाभावी उपक्रम

प्रशांत चंदनखेडे वणी 

उन्हाळा सुरु झाल्याने उष्णतेची दाहकता जाणवू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उष्णतेचे चटकेही जाणवायला लागले आहेत. उष्णतेने जीव व्याकुळ होऊन घसा कोरडा पडायला लागला की डोळे पिण्याच्या पाण्याचा शोध घ्यायला लागतात. त्यामुळे तहानलेल्या जीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये ही निर्मळ भावना ठेऊन दरवर्षी प्रमाणे यावर्षीही राजस्थानी महिला मंडळाच्या सौजन्याने बसस्थानक आवारात पाणपोई सुरु करण्यात आली आहे. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी आणि उन्हाळ्यातील उष्णतेची दाहकता वाढल्याने राजस्थानी महिला मंडळाने प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ४ मार्चला या पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं.

वणी आगार प्रबंधक विवेक बन्सोड, आगार प्रभारी लता मुळेवार, राजस्थानी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा हेमलता झाबक, विद्यमान अध्यक्षा समता चोरडिया यांच्या हस्ते फीत कापून बसस्थानकावरील या पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या सदस्या तरुणा जैन, चंचल गुप्ता, सरोज भंडारी, स्नेहलता चुंबळे, पायल आबड, ज्योती बोथरा, उषा कोठारी, कीर्ती सोनी, विद्या मुथा, हेमा पोद्दार, आरती मुनोत, मधू कोटेचा आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या. संचालन खुशाली गुप्ता यांनी तर आभार प्रदर्शन प्रेक्षा कटारिया यांनी केले.  

लग्नसराई, देवदर्शन व सण उत्सवाचे दिवस असल्याने प्रवाशांची प्रवासवारी सुरु झाली आहे. उन्हाळा म्हणजे प्रवासाचा काळ. सुट्यांच्या दिवसांत आप्त स्वकीयांच्या भेटीगाठी घेण्याचा हा काळ असल्याने उन्हाळ्यात प्रवासाची रेलचेल पाहायला मिळते. मार्च महिना सुरु झाल्याने प्रवाशांची प्रवासाची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. उष्णतेची दाहकता व प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये किंवा त्यांना पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकावे लागू नये, या उद्देशाने राजस्थानी महिला मंडळाने बसस्थानकावर पाणपोईची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तहानलेले जीव तृप्त व्हावे या आस्थेतून राजस्थानी महिला मंडळ दरवर्षी पाणपोईच्या माध्यमातून तहानलेल्यांची तहान भागवते. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक होतांना दिसत आहे. 


No comments:

Powered by Blogger.