Latest News

Latest News
Loading...

लग्न जुळल्यानंतरही विवाहित प्रियसीसोबत प्रेमसंबंध कायम ठेऊ पाहणाऱ्या प्रियकरावर गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी 

प्रियकराचे लग्न जुळल्यानंतर प्रेम प्रकरणाला पूर्णविराम देणाऱ्या प्रेमिकेला प्रियकराकडून होणारा त्रास असह्य झाल्याने प्रेमिकेने शेवटी प्रियकराविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारी वरून पोलिसांनी तिच्या एक्स बॉयफ्रेंड विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नझीम इकबाल खान पठाण (२७) रा. रंगनाथ नगर असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे. 

दोन वर्षांपूर्वी या दोघांचे सूत जुळले. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमात आखंड बुडाल्यानंतर प्रेम कहाणीत ट्विस्ट आला. प्रियकराचे लग्न जुळले. त्यामुळे विवाहित प्रियसीने त्याच्या पासून ब्रेकअप घेतला. मात्र त्याच्या हृदयात तिची धडकन कायम होती. तो तिला विसरायला तयार नव्हता. लग्न झाले तरी प्रेम कायम ठेवण्याची त्याची इच्छा होती. त्यामुळे तो तिला सतत फोन करायचा. तिच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करायचा. तू भुलू शकते, पण मी विसरू शकत नाही, अशी काहीशी अवस्था त्याची झाली. मात्र ती काही एक ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याचे पाहून नंतर तो तिला शिवीगाळ करू लागला. ७ मार्चला त्याने तिला शर्मा चौपाटी येथे गाठले, व तिचा हात पकडून तिला बाजूला चल म्हटले. परंतु तिची नकारात्मक भूमिका पाहून प्रियकराचा पारा चढला. प्रियसीला शिवीगाळ करून रागातच तो तेथून निघून गेला. प्रियकराचा हा अवतार पाहून प्रियसीच्या मनात धडकीच भरली. वेडावलेला हा प्रियकर उद्या कुठलीही भूमिका घेऊ शकतो, या भीतीने तिने सरळ त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. विवाहित महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध बीएनएसच्या कलम ७४, ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पीएसआय धनंजय रत्नपारखी करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.