Latest News

Latest News
Loading...

लग्न सोहळ्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील तिरुपती मंगल कार्यालय येथे लग्न सोहळ्यात आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १२ एप्रिलला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील रहिवाशी असलेली सरस्वती भालचंद्र गाताडे (५८) ही महिला वणी येथील तिरुपती मंगल कार्यालयात आपल्या नाते संबंधातील लग्न सोहळ्याकरिता आली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्याने हात चलाखी दाखवून नकळत महिलेच्या गाळातील सोन्याची पोत (वजन ३.५ तोळे किंमत १ लाख १३ हजार ५० रुपये) हिसकावली. गळयातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे काही वेळानंतर महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिला जबर धक्का बसला. त्यामुळे महिलेने तात्काळ पोलिस स्टेशनला धाव घेतली. अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याची पोत हिसकावल्याची तक्रार महिलेने पोलिस स्टेशनला नोंदविली. सरस्वती गाताडे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय धीरज गुल्हाने करीत आहे. 

लग्न समारंभ किंवा नागरिकांची गर्दी असलेल्या इतर कार्यक्रमांमध्ये चोरट्यांचाही वावर वाढल्याचे दिसून येत आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे सोन्याच्या दागिन्यांवर हातसाफ करू लागले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी बिनधास्त वावरणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हे चोरटे अतिशय शिताफीने लंपास करू लागले आहेत. भांदेवाडा येथे सुरु असलेले कीर्तन ऐकण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा गोफ अज्ञात चोरट्याने हिसकावल्याची घटना ताजी असतांनाच तिरुपती मंगल कार्यालयात लग्न सोहळ्यात आलेल्या महिलेच्या गळ्यातीलही साडे तीन तोळ्याची सोन्याची पोत चोरट्याने लंपास केल्याने कार्यक्रमांच्या ठिकाणी दागिने घालून येणाऱ्या महिलांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे. 

No comments:

Powered by Blogger.