Latest News

Latest News
Loading...

वणी पोलिस स्टेशन हद्दीत आढळला आणखी एक अनोळखी मृतदेह, मागील तीन दिवसांत आढळले दोन मृतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पोलीस स्टेशन हद्दीत एका पाठोपाठ एक अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळू लागल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे व्यक्ती उष्माघाताने मृत्युमुखी पडत आहेत की, आणखी कुठले कारण आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शहरातील दीप्ती टॉकीज जवळ आणखी एका इसमाचा मृतदेह आढळून आला. ५० ते ५५ वर्षे वयोगटातील हा इसम असून त्याची उंची ५ फूट ८ इंच एवढी आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. मागील तीन दिवसांत दोन व्यक्तींचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले. सुशगंगा पॉलिटेक्निक जवळ आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मृतक हा घुग्गुस येथील रणजित बहादूर सिंग (२५) असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पूर्ण शहानिशा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केला. मात्र दीप्ती टॉकीज जवळ आढळलेल्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटायची आहे. पोलिस अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून सदर मृत इसम हा कुणाचा नातेवाईक किंवा कुणाच्या परिचयाचा असल्यास त्यांनी जमादार गजानन होडगीर (9623441265) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Powered by Blogger.