Latest News

Latest News
Loading...

चक्क सुलभ शौचालयाच्या मागे सुरु होता मटका, एलसीबी पथकाने केली धडक कार्यवाही

प्रशांत चंदनखेडे वणी 

अवैध धंद्याचं समूळ उच्चाटन करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश असल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने शहरात गस्त घालत असतांना त्यांना भाजी मंडई परिसरातील सुलभ शौचालयाच्या मागे वरळी मटका सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे लोकांची मोठी गर्दी आढळून आली. तेथे काही इसम लोकांकडून पैसे घेऊन एका छोट्या पावतीवर मटक्याचे आकडे लिहून देतांना आढळले. सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे मटका अड्डा चालविला जात असल्याची खात्री पटल्यानंतर एलसीबी पथकाने त्याठिकाणी धाड टाकली. एलसीबी पथकाने धाड टाकताच मटका लावणारे लोक पळत सुटले. तसेच मटका पट्टी फाडणाऱ्यांनीही पळ काढला. मात्र मटका पट्टी फाडणारा एक जण पथकाच्या हाती लागला. पथकाने त्याला ताब्यात घेत घटनास्थळावरून मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. हि कार्यवाही १९ एप्रिलला दुपारच्या सुमारास करण्यात आली.

शहरात ठिकठिकाणी राजरोसपणे मटका अड्डे सुरु आहेत. पोलिस स्टेशनच्या उंबरठ्यापासून काही अंतरावरच मटका जुगार खेळला जात असतानाची त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. सिंधी कॉलनी परिसरात खुलेआम मटका अड्डा सुरु आहे. पोलिसांचं तेथून जाणं येणंही सुरु असते. पण बियरबारच्या बाजूला सुरु असलेला मटका अड्डा त्यांच्या दृष्टीस पडत नाही. तसेच एकता नगरच्या विरुद्ध बाजूला वेकोलिच्या प्रवासी निवाऱ्याजवळही उजागरपणे मटका पट्टी सुरु आहे. परंतु पोलिस मात्र याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. शहरात इतरही ठिकाणी मटका अड्डे सुरु आहेत. पोलिस केवळ थातुर मातुर कार्यवाही करून आपली पाठ थोपटून घेत आहेत. एका मटका बहाद्दराने तर चक्क सुलभ शौचालय असलेल्या ठिकाणीच मटका अड्डा थाटला. मात्र याची कल्पना पोलिसांना असू नये, याचेच नवल वाटते. परंतु गुन्हेगारी वर्तुळावर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या एलसीबी पथकाला या मटका अड्ड्याची भनक लागली. त्यामुळे एलसीबी पथकाने या मटका अड्ड्यावर थेट कार्यवाही करून मटका पट्टी फाडणाऱ्याला अटक केली. 

सुलभ शौचालाय असलेलं ठिकाणच मटका अड्डा बनल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मटका बहाद्दरांनी चक्क सुलभ शौचालयाच्या मागे मटका पट्टी सुरु केली. शहर व ग्रामीण भागातून भाजी बाजारात येणारे तसेच तेथील मालवाहू वाहनधारक व मजूरवर्ग जवळच मटका अड्डा असल्याने तेथेच घुटमळतांना दिसायचे. मटका जुगार खेळण्यातच संपूर्ण दिवस व श्रमाचा पैसा घालवायचे. ही बाब एलसीबी पथकाच्या कानावर पडताच त्यांनी तडक या मटका अड्ड्यावर धाड टाकली. पथकाने धाड टाकताच मटका लावणारे व काही मटका पट्टी फाडणारेही सुसाट पळत सुटले. मात्र मटका पट्टी फाडणारा रवि राजेश घुगरे (३०) रा. रामपुरा वार्ड हा पथकाच्या हाती लागला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळावरून मटका साहित्य व रोख रक्कम असा एकूण १२१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या मटक्याचा मालक कोण, हे मात्र अद्याप कळू शकले नाही. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पथकाचे उल्हास कुरकुटे, सुधिर पांडे, आकाश अवचारे यांनी केली. 

No comments:

Powered by Blogger.