प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे दोघा बापलेकांनी एकाला शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना १८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजूर (कॉ.) येथे राहणारा मोहम्मद आसिफ एनुल हक ( २५) हा गुप्ता कोल वॉशरी येथे लोडर ऑपरेटर म्हणून काम करतो. १८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता मोहम्मद आसिफ हा गावातीलच ताज बुक डेपो येथे एकटा बसून असतांना राजूर (कॉ.) येथेच राहणारे मो. कादिर अली झाकीर अली (४८) व मो. सलीम उर्फ सैफ कादिर अली हे दोघे बापलेक तेथे आले. त्यांनी मो. आसिफला तुझा भाऊ मोहम्मद मौला कुठे आहे असे विचारले. त्यावर आसिफने मला माहित नाही तो कुठे आहे, असे उत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या दोन्ही बापलेकांनी आसिफला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच सलीम उर्फ सैफ याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड आसिफच्या मानेजवळ मारला. लोखंडी रॉडचा मार लागल्याने आसिफ जखमी झाला. तेवढ्यात आसिफचा भाऊ मोहम्मद आमिन हा तेथे आला. आमिनने माझ्या भावाला का मारहाण केली असे विचारले असता कादिरने तुझ्याशी काहीही बोलायचे नाही, असे उत्तर दिले. तेंव्हा आमिनने भांडण येथेच मिटवून टाक असे म्हटले. तेंव्हा सलीम उर्फ सैफने त्याच्याही मानेजवळ काठी मारली. मोहम्मद मौला कुठे आहे, यावरून सुरु झालेला वाद मारहाणी पर्यंत पोहचला.
मो. आसिफ याने झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी मो. कादिर अली झाकीर अली व त्याचा मुलगा मो. सलिम उर्फ सैफ कादिर अली या दोन्ही बापलेकांवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: