बहिणीबद्दल सासरी लावालावी करीत असल्याच्या संशयावरून मायलेकाची शेजाऱ्याला मारहाण

प्रशांत चंदनखेडे वणी 

बहिणीच्या संसारात ढवळाढवळ करीत असल्याच्या संशयावरून दारूच्या नशेत शेजाऱ्याशी वाद घालून त्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुर्भा (नवीन) या गावात घडली. मारहाणीत जखमी झालेल्या शेजाऱ्याने मारहाण करणाऱ्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मायलेकावर गुन्हा दाखल केला आहे. 

झरी तालुक्यातील दुर्भा (नवीन) या गावात एकमेकांच्या घराशेजारी राहणाऱ्या अशोक हुसैन्ना करडवार (४६) व जगदीश चिन्नना दुर्लावार (३५) यांच्यात काही ना काही कारणावरून नेहमी खटके उडत असतात. जगदीश दुर्लावार हा दारूच्या नशेत नेहमी वाद घालत असल्याचे अशोक करडवार याचे म्हणणे आहे. अशोक हा बहिणीच्या संसारात विष कालविण्याचं काम करीत असल्याने बहिणीला सासरी प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याच्या संशयावरून जगदीश अशोकशी नेहमी वाद घालायचा. २२ एप्रिलला रात्री ८ वाजता जगदीश दारू पियुन आला व याच कारणावरून अशोकशी वाद घालू लागला. त्यांच्यातला वाद विकोपाला जाऊन जगदीशने अशोकला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरवात केली. अशोकच्या पाठीवर, मानेवर व उजव्या हातावर लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यात आल्याने त्याच्या पाठीतून रक्तस्त्राव होऊ लागला. लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याने अशोक हा चक्कर येऊन खाली पडला. मुलगा मारहाण करीत असतांना आईनेही त्याला साथ दिली. जगदीशच्या आईने देखील अशोकला थापडा बुक्क्यांनी मारहाण करतांनाच मध्यस्थी करण्यास आलेल्या अशोकच्या पत्नीलाही धक्का बुक्की करून तिला ढकलून दिले. तसेच परत बहिणीबद्दल तिच्या सासरी लावालावी केल्यास जीवानिशी ठार मारेन, अशी धमकीही जगदीशने अशोकाला दिली. 

जगदीशच्या मारहाण व धमकीमुळे भयभीत झालेल्या अशोकने सरळ पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. अशोक करडवार याच्या तक्रारी वरून पोलिसांनी जगदीश दुर्लावार व त्याच्या आईवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाटण पोलिस करीत आहे.   


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी