प्रशांत चंदनखेडे वणी
घराशेजारी राहणारा व्यक्ती समोरून येतांना दिसल्याने त्याला शेजाऱ्याने हाक मारली. मात्र तो जवळ आल्यानंतर प्रचंड दारू पियुन असल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्याने त्याला जाण्यास सांगितले. मात्र दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या व्यक्तीने मला हाक का मारली म्हणून शेजाऱ्याशीच वाद घालायला सुरवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेजाऱ्याच्या डोक्यावर दगड मारून त्याचे डोके फोडले. दारुड्याने डोक्यावर दगड मारल्याने शेजारी जखमी झाला. त्यामुळे त्याने झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरड या गावात घडली.
मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अपराधीक घडामोडी वाढीस लागल्या आहेत. मारहाणीच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. पोलिसांचा वचक न राहिल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागली आहे. मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरड येथील अनिल वसंता मंगलपवार (३१) व दिपक विठ्ठल झाडे (३०) हे एकमेकांच्या घराशेजारी राहतात. ३१ मार्चला सकाळी ११ वाजताच्या सुमारास अनिल मंगलपवार हा गावातील पानठेल्याजवळ उभा असतांना त्याला दिपक झाडे हा समोरून येतांना दिसला. शेजारी या नात्याने अनिलने दिपकला सहज हाक मारली. अनिलने हाक मारल्याने दिपक त्याच्या जवळ आला. परंतु दिपक हा प्रचंड दारू पियुन असल्याचे अनिलच्या लक्षात येताच त्याने त्याला जायला सांगितले. मात्र दारूच्या नशेत तर्रर्र असलेल्या दिपकने अनिलवरच शाब्दिक हल्ला चढविला. दारूच्या नशेत अनिलशी वाद घालतांनाच त्याने अनिलच्या डोक्यावर दगड मारला. त्यामुळे अनिलच्या डोक्याला दुखापत होऊन त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. दिपक अनिलला मारहाण करीत असतांना पानठेल्याजवळ असलेले लोक धावून आले, व त्यांनी मध्यस्थी करून त्यांचा वाद सोडविला.
त्यानंतर अनिल सरळ घरी निघून गेला. सायंकाळी अनिलची पत्नी शेतातून घरी परतल्यानंतर तो पत्नीला सोबत घेऊन पोलिस स्टेशनला आला. आणि झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. अनिल मंगलपवार याच्या तक्रारी वरून पोलिसांनी दिपक झाडे याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
No comments: