Latest News

Latest News
Loading...

संसारिक जीवनाची सुखस्वप्ने रंगविण्याचा काळात नवविवाहितेने घेतला गळफास

प्रशांत चंदनखेडे वणी 

नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. ४ एप्रिलला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. साक्षी अश्विन हिवरकर (२५) रा. सदाशिव नगर चिखलगाव ता. वणी असे या गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे. 

तालुक्यातील चिखलगाव येथील सदाशिव नगर येथे लग्न होऊन आलेल्या साक्षीने नैराश्येतून राहत्या घरी गळफास घेतला. एक वर्षांपूर्वीच साक्षी हिचे अश्विन सोबत लग्न झाल्याचे सांगण्यात येते. संसारिक जीवनाची सुखस्वप्ने रंगविण्याच्या काळात साक्षीने मृत्यूला कवटाळले. संसारिक जीवनाला जेमतेम सुरवात झालेली असतांनाच साक्षीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही नवविवाहित तरुणी घराच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना आढळून आली. ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. संसारिक जीवनात रममाण होण्याच्या काळात साक्षी हिने मृत्यूचा मार्ग निवडल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जीवनाची आस सोडून तिने मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळल्याने कुटुंबं दुःखसागरात बुडालं आहे. तिच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. नवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.