Latest News

Latest News
Loading...

एपीआय धीरज गुल्हाने व पोलिस पथकावर बळ आजमावणाऱ्या मद्यधुंद ट्रक चालकाला अटक


प्रशांत चंदनखेडे वणी 

मद्यधुंद ट्रक चालक मध्यरात्री ट्रक जोरजोरात रेस करून नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करीत असतांनाच मोहल्ल्यातील लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती मिळताच रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले एपीआय धीरज गुल्हाने हे पोलिस पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांना ट्रक चालक हा ड्रायव्हर सीटवर बसून फुल एक्सलेटर देत ट्रक रेस करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी ट्रक चालकाला ट्रकखाली उतरवून त्याची विचारपूस करीत असतांनाच त्याने पोलिसांवरच बळ आजमावण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत तो पोलिसांशीच हुज्जत घालून ओढाताण करण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांना ढकलाढकल करणाऱ्या ट्रक चालकाला शेवटी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पियुन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी ट्रक रेस करून लोकांना विनाकारण त्रास व शिवीगाळ करतांनाच शासकीय कामात अडथळे निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नौमान शेख इरशाद शेख (२४) रा. कारवा रोड, नरेंद्र नगर वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर असे या पोलिसांनी अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. 

एपीआय धीरज गुल्हाने हे पोलिस पथकासह विविध गुन्ह्यातील व फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता शहरात गस्त घालत असतांना २८ एप्रिलला रात्री १२.३० वाजता शहरातील तलाव रोडवर एक ट्रक चालक सार्वजनिक ठिकाणी ट्रक उभा करून ट्रक जोरजोरात रेस करीत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा एपीआय गुल्हाने हे पोलिस पथकासह माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता त्यांना तेथे नागरिकांची मोठी गर्दी आढळून आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांना एक ट्रक (MH ३४ AV ९७१८) उभा असलेला दिसला. ट्रक चालक हा जोरजोरात ट्रक रेस करून लोकांना शिवीगाळ करीत होता. त्यामुळे एपीआय गुल्हाने यांनी ट्रक चालकाला ट्रकखाली उतरवून त्याचे नाव विचारले. तसेच त्याच्याकडे आणखी विचारपूस करीत असतांनाच तो पोलिसांशीच हुज्जत घालू लागला. पोलिसांवरच बळाचा वापर करीत तो त्यांना ढकलाढकल करून शासकीय कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याचे बळ आजमाविण्याचे प्रयत्न हणून पाडत त्याला ताब्यात घेतले. एपीआय धीरज गुल्हाने यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी नौमान शेख इरशाद शेख याच्यावर बीएनएस, मदाका व मपोकाच्या कलम ११०, ८५ , २२१, ३५२, ३५५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.