प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील मंदर शेत शिवारात गावातीलच इसम मृतावस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना मंगळवार दि. २९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बाळू उर्फ बाळकुष्ण रामचंद्र येवले वय अंदाजे ५५ वर्षे असे मृतकाचे नाव आहे.
मंदर शेत शिवारात गावातील काही लोकांना एक इसम मृतावस्थेत आढळून आला. नंतर ही वार्ता संपूर्ण गावात पसरली. त्यामुळे घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी उसळली. ही वार्ता मृतकाच्या मुलांच्याही कानावर पडल्यानंतर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेंव्हा त्यांना मृतक हा त्यांचाच बाप असल्याचे निदर्शनास आले. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक बाळू येवले हा दारूचा व्यसनी असल्याचे सांगण्यात येते. दुपारी दारू पियुन येत असतांना अति मद्य प्राशनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या उष्णतेचा पाराही प्रचंड वाढला आहे. भरदुपारी दारू पिल्यानंतर दारूच्या नशेत तो शेत शिवारात पडून राहिला. आणि उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन अहवालातून ते समोर येईलच. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: