Latest News

Latest News
Loading...

मध्यरात्री संशयितरित्या आढळलेल्या इसमाला पोलिसांनी केली अटक

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील योगीराज नगर येथे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मध्यरात्री संशयितरित्या आढळून आलेल्या इसमाला पोलिसांनी अटक केली. निर्माणाधीन वास्तूत अंधारात लपून बसलेला हा इसम अपराधीक घटना घडविण्याच्या उद्देशानेच येथे लपून असल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी त्याला अटक केली. रमेश लटारी राऊत (३७) रा. सिंधीवाढोणा ता. वणी असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

रविवार २० एप्रिलला रात्री शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना पहाटे २.३५ वाजताच्या सुमारास बसस्थानका मागील योगीराज नगर येथे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी एक इसम संशयितरित्या आढळून आला. निर्माणाधीन वास्तूत तो लपून बसला होता. त्याच्यावर पोलिसांची नजर पडताच तो तेथून पळ काढण्याचा तयारीत असतांनाच पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने रमेश लटारी राऊत असे सांगितले. मध्यरात्री निर्माणाधीन वास्तूत काय करतो व अंधारात येथे लपून का बसला आहे, याबाबत पोलिसांनी त्याला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावरून चोरी किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशानेच हा इसम येथे लपून बसला असल्याचा दाट संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. पोलिस चौकशीतही तो समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला. ही कार्यवाही रात्रपाळीत कर्तव्य बजावणाऱ्या सपोनि सुदामा आसोरे व पोलिस पथकाने केली.  

No comments:

Powered by Blogger.