प्रशांत चंदनखेडे वणी
दोन मुलांची आई असलेली महिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या गेली. संसारिक जीवनाचा विसर पडून ही महिला प्रेमात रममाण झाली. नंतर प्रियकराशी तिचं नातं अधिकच घट्ट होत गेलं. अशातच त्यांच्यातील प्रेमसंबंध दृढ झाले. एकमेकांशी भेटीगाठी वाढल्यानंतर प्रियकराने तिला लग्नाची भुरळ घातली. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ५ फेब्रुवारी ते १९ मार्च हा त्यांच्या प्रणयाचा काळ राहिला. या काळात त्यांच्यात वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. नंतर प्रियकराला तिची सवयच झाली. तिने भेटायला येण्यास टाळाटाळ केला की तो तिच्या सोबत नको त्या अवस्थेत असलेले फोटो व व्हिडिओ तिच्या नवऱ्याला पाठविण्याची धमकी द्यायचा. त्याच्या सततच्या या तकाद्याला ती प्रचंड कंटाळली होती. त्याची तिच्याशी लग्न करण्याचीही मानसिकता दिसत नव्हती. लग्नाच्या इराद्याने शारीरिक सुख उपभोगलेल्या प्रियकराने नंतर घुमजाव केल्याने प्रेयसीने त्याच्या विरोधात पोलिस स्टेशनला शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. प्रेयसीच्या तक्रारी वरून पोलिसांनी प्रियकरावर शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.
वणी शहरातीलच रहिवाशी असलेले दोन विवाहित युवक(३६) युवती(३१) एकमेकांच्या प्रेमात पडले. ती म्हणाली "मै दो बच्चोंकी माँ रे", तरीही तो मनाला नाही. नंतर तीही त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. तो म्हणाला मी तुझ्याशी लग्न करतो. मात्र आधीच लग्न झाले असतांनाही त्याची हौस भागली नव्हती. तिलाही लग्न झाल्याचा विसर पडला. दोन मुलांची आई असल्याचे भान विसरून तीही त्याच्या प्रेमात पडली. नंतर त्यांच्यात प्रणय रंगला. एक ते सव्वा महिन्याच्या काळात त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने कधी भेटायला येण्यास नकार दिला तर तुझे फोटो व व्हिडिओ आहे माझ्याजवळ, याची तो तिला आठवण करून द्यायचा. आपल्या दोघांचे नको त्या अवस्थेतील फोटो व व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला पाठवेन, अशी धमकी देऊन तो तिला भेटायला येण्यास भाग पाडायचा. आणि वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा.
त्याच्या सततच्या या तकाद्याने ती प्रचंड कंटाळली होती. त्यातल्यात्यात त्याची तिच्याशी लग्न करण्याचीही मानसिकता दिसत नव्हती. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिचा दीर्घ काळ शारीरिक उपभोग घेतला. मात्र नंतर त्याने घुमजाव केल्याने महिलेला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. त्यामुळे तिने आपल्या प्रियकराविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. प्रेयसीच्या तक्रारी वरून पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध बीएनएसच्या कलम ६९, ३५१(२)(३), नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे.
No comments: