Latest News

Latest News
Loading...

बापरे, आलिशान मालवाहू ट्रक मधून सुरु होती रेती तस्करी, महसूल विभागाने केली धडक कार्यवाही

प्रशांत चंदनखेडे वणी 

वाळू माफियांनी वाळू चोरीचा सपाटाच लावला असून विविध शक्कली लढवून ते वाळू चोरीचे मनसुबे साधत आहेत. वाळू तस्करीतून अमाप पैसा मिळत असल्याने अनेकांचे हात वाळू तस्करीत गुंतले आहेत. पांढरपेशी लोकही रेती तस्करीत उतरल्याने रेती तस्करी आता प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे रेती तस्करीला विशेष महत्व प्राप्त झालं असून तस्करांचा वेगळाच थाट पाहायला मिळत आहे. मात्र रेती तस्करीत तालुका गाजू लागल्याने महसूल विभागाने आता तस्करांच्या मानगुट्या आवळण्याकरिता कंबर कसली आहे. महसूल विभागाने तस्करांविरुद्ध धडक कार्यवाहीची मोहीम आरंभली असून रेती तस्करीच्या वाहनांवर एकामागून एक कार्यवाही करण्यात येत आहे. बुधवार ३० एप्रिलला महसूल विभागाने आलिशान मालवाहू ट्रक मधून होणाऱ्या रेती तस्करीचा पर्दाफाश केला. आता पर्यंत हायवा, टिप्पर व ट्रॅक्टरने रेती चोरी करणारे तस्कर आता आलिशान मालवाहू ट्रकने रेती तस्करी करू लागले आहेत. असाच एक रेती तस्करी करणारा आलिशान ट्रक महसूल विभागाने पकडला असून तो वणी एसटी डेपोमध्ये लावला आहे. 

कुणालाही तिळमात्र संशय येणार नाही अशा एका मालवाहू ट्रक मधून होणारी रेती तस्करी महसूल विभागाने आपल्या माहिती कौशल्यातून उधळून लावली. वाळू चोरटे वाळू चोरीच्या वेगवेगळ्या तऱ्हा आजमावत आहेत. विविध शक्कली लढवून ते वाळू चोरीचे डाव साधत आहेत. मात्र महसूल विभागही आता अलर्ट मोडवर आला असून तस्करांच्या बारीक हालचालींवरही महसूल विभाग पूर्ण लक्ष ठेऊन असल्याचे मागील काही दिवसांतील कारवायांवरून दिसून येत आहे. एका आलिशान मालवाहू ट्रक मधून रेती तस्करी होत असल्याची खात्रीशीर माहिती महसूल विभागाला मिळाली. या माहिती वरून नायब तहसीलदार ब्राह्मणवाडे व अधिकारी सुनिल उराडे यांनी रात्री ८.३० वाजता यवतमाळ बायपास मार्गावरील नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंग जवळ सापळा रचून रेतीची चोरटी वाहतूक करणारा आलिशान ट्रक पकडला. विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या या ट्रकवर कार्यवाही करून ट्रक वणी एसटी डेपोत लावला आहे. या धडक कार्यवाहीत महसूल विभागाने एक ट्रक (MH २९ BE ०८००) व चार ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही नायब तहसीलदार ब्राह्मणवाडे, अधिकारी सुनिल उराडे व महसूल विभागाने केली.

No comments:

Powered by Blogger.