Latest News

Latest News
Loading...

नृत्य स्पर्धेत भूमीचा डंका, तिने गाजविल्या अनेक नृत्य स्पर्धा, वणीच्या संस्कृतीत उगवला आणखी एक हिरा

प्रशांत चंदनखेडे वणी 

नृत्याचा तिला प्रचंड छंद, नृत्यात तिची रुचिही फारच, नृत्य हा तिच्या जिव्हाळ्याचा विषय, नृत्य करतांना ती बेभान होते, नृत्य कलेत ती अतिशय पारंगत झालीय, नृत्याचं वेड तिच्या नसानसात भिनलंय, अनेक नृत्य स्पर्धा तिने गाजवाल्याय, महाराष्ट्रात कुठेही डान्स कॉम्पिटिशन असो, ती नक्कीच भाग घेते, आणि स्पर्धेसह प्रेक्षांची मनेही जिंकते, तिला मिळालेले मेडल व सन्मानचिन्ह एखाद्या अव्वल दर्जाच्या नृत्यकारालाही लाजवेल एवढे आहेत, नृत्य कला विश्वात तिने वेळोवेळी आपली चमक दाखविली आहे, नृत्याच्या मोठमोठ्या मंचावर तिने स्वतःला सिद्ध केलं आहे, नृत्याच्या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धेतही ती चमकली आहे, आपल्या आंतरिक कला गुंणांनी नृत्याचा अविष्कार घडविणारी गुणी मुलगी आहे भूमीका पौर्णिमा विजय मोडक. भूमीने अवघ्या १४ वर्षाच्या वयात नृत्य कलेत अनेक कीर्तिमान मिळविले आहेत. बालपणापासून नृत्याची असलेली आवड आता तिची नृत्य कला क्षेत्रात एक वेगळी ओळख बनली आहे. तिची आता छोट्या पडद्यावरील डांस स्पर्धा गाजविण्याची जिद्द आहे. आणि तशी या कर्तबगार मुलीची तयारीही सुरु आहे. नुकताच तिने वर्धा येथे झालेल्या नॅशनल डांस स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावून वणीच्या नावलौकिकात भर घातली आहे. वणीच्या सांस्कृतिक इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. 

शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणारी भूमीका पौर्णिमा विजय मोडक ही गोदावरी अर्बनचे वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांची होतकरू मुलगी आहे. तिने जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या जोरावर नृत्य क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने नृत्याच्या अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. महानगरांमधील नृत्य स्पर्धेतही तिने भाग घेतला आहे. आणि तेथेही तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. वर्धा येथे नुकतीच नॅशनल डांस स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विदर्भातील अनेक दिग्गज कलावंतांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या कलावंतांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केली. परंतु भूमीने मात्र नृत्य कलेचा अविष्कार घडविला. तिने बॉलिवूडच्या गीतावर सादर केलेल्या नृत्याने सर्वांचेच डोळे दिपवले. स्पर्धेत तिने सादर केलेल्या नृत्याविष्काराला प्रथम क्रमांक मिळाला. नृत्य स्पर्धेत क्रमांक मिळवणं आता तिच्यासाठी फारसं अवघड व कठीण राहिलेलं नाही, अशी नृत्य कला तिने स्वतःत अवगत केली आहे. आज ती नृत्य कलेत पारंगत झाली, याचं श्रेय ती आपले आई वडील व नृत्य प्रशिक्षक मंगेश चटारे यांना देते. तिच्या नृत्य कला क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचाली करीता लोकसंदेश न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. 

No comments:

Powered by Blogger.