प्रशांत चंदनखेडे वणी
जिल्हा पोलिस दलातर्फे आणखी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला व मुलींना आत्मसुरक्षेच्या दृष्टीने उत्तम मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याकरिता जिल्हा पोलिस दलाकडून एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत १४ ते १६ मे पर्यंत यवतमाळ येथे महिला व मुलींकरिता दोन दिवसीय मोफत शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांसाठी करिअर घडविण्याच्या विविध संधी व त्याबद्दलची माहितीही देण्यात येणार आहे. महिलांच्या स्व-सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दलाकडून उचलण्यात आलेलं हे एक प्रशंसनीय पाऊल आहे.
या शिबिरात सायबर क्राईम, महिला विषयी कायदे, करियर गायडन्स, कराटे प्रशिक्षण आदी महिलांच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणारे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्त्रियांसाठी आत्मसुरक्षेच्या दृष्टीने कायदेशीर माहिती व कराटे प्रशिक्षण देणारं अत्यंत महत्वपूर्ण हे शिबीर असून महिला व मुलींनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्याकरिता स्त्रियांना वणी पोलिस स्टेशन येथे आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. आनंदाची बाब म्हणजे या शिबिरात राहण्यापासून तर जेवणापर्यंतची व्यवस्था अगदीच उत्तम व मोफत राहणार आहे. कराटे प्रशिक्षणासाठी गणवेशही मोफत देण्यात येणार आहे. त्यात टी-शर्ट व पॅन्ट किट असणार आहे. आधार कार्डची झेरॉक्स व पासपोर्ट फोटोसह प्रवेश फॉर्म भरून आजच आपला प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सपोनि सुदामा आसोरे (9130035187) व पोलिस शिपाई श्याम राठोड (7507224455) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.
No comments: