प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (१० वी) परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले असून अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याचा निकाल ८८.७७ टक्के लागला आहे. यावर्षीही गुण तालिकेत मुलींनीच बाजी मारली. यंदाही मुलांपेक्षा मुलींचेच उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. जनता विद्यालयाची अनुराधा अरविंद महालक्ष्मे या विद्यार्थिनीने १० वी च्या परीक्षेत ९८.२० टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर लॉयन्स हायस्कुलची पूर्वा प्रमोद करमनकर (९५.८० टक्के) व मॅकरून शाळेची इशा ढुमणे (९३ टक्के) या दोन्ही विद्यार्थिनी शाळेतून प्रथम आल्या आहेत. तसेच वणी पब्लिक स्कुलचा सिद्धांत जितेंद्र डगावकर हा विद्यार्थी ९२ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला.
एसएससी परीक्षेत तालुक्यातील ४३ पैकी ६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला. तर बऱ्यापैकी विदयार्थी हे गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शहरातील विवेकानंद विद्यालयाचा निकाल ८३.०८ टक्के लागला. विद्यालयातून २०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १७ विदयार्थी गुणवत्ता श्रेणीत, ४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २३ विदयार्थी सरासरी गुण घेऊन पास झाले आहेत. जनता विद्यालयातून ३४९ विद्यार्थ्यांनी १० वी ची परीक्षा दिली. त्यापैकी ३०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४० विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, ७० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १४४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५२ विद्यार्थी सरासरी गुण घेऊन पास झाले आहेत. एसपीएम हायस्कुलच्या २१२ विद्यार्थ्यांनी १० वी ची परीक्षा दिली होती. त्यापैकी १९७ विदयार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ९२.९२ टक्के एवढा लागला. ३५ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, ४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४२ विद्यार्थी सरासरी गुण घेऊन पास झाले आहेत.
आदर्श विद्यालयाचा निकाल ५१.२५ टक्के लागला. विद्यालयातून ८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एक विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, ४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २० विद्यार्थी सरासरी गुण घेऊन पास झाले आहेत. लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कुलचा निकाल ९८.६४ टक्के लागला. शाळेतून १४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५७ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, ५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४ विद्यार्थी सरासरी गुण घेऊन पास झाले आहेत. श्री नूसाबाई चोपणे विद्यालयाचा निकाल ८३.३३ टक्के लागला. विद्यालयातून ४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, ७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ८ विद्यार्थी सरासरी गुण घेऊन पास झाले आहेत.
शासकीय माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतून १८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आणि अठराही विद्यार्थी पास झाले. ३ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले. राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयाचा ८६.६६ टक्के निकाल लागला. शाळेतून १५ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २ प्रथम श्रेणीत, १० द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी सरासरी गुण घेऊन उत्तीर्ण झाला. वणी पब्लिक स्कुलचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतून ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २ विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी सरासरी गुण घेऊन पास झाला.
संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलचा निकाल ९५ टक्के लागला. शाळेतून ४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १० विद्यार्थी गुणवत्ता श्रेणीत, १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी सरासरी गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुलचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतील १९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आणि एकोणवीसही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १० गुणवत्ता श्रेणीत, ८ प्रथम श्रेणीत तर १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाला आहे. दहावीच्या निकालात वणी तालुका हा माघारला असून जिल्ह्यात तालुका हा तेराव्या स्थानावर आहे. मारेगाव तालुक्याचा ८९.७५ टक्के तर झरीजामणी तालुक्याचा ९१.६३ टक्के निकाल लागला आहे.
No comments: