Latest News

Latest News
Loading...

रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंडयाजवळ बुद्ध जयंती साजरी

प्रशांत चंदनखेडे वणी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन वणीच्या विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन करून तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नंतर महिला मंडळाकडून सुस्वरात बुद्धवंदना घेण्यात आली. तदनंतर उपस्थितांना शीतपेय वाटप करण्यात आले. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सम्यक ज्ञानावर प्रकाश टाकण्यात आला. पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. पौर्णिमेलाच त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. आणि पौर्णिमेलाच त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून संबोधलं जातं. बुद्ध जयंतीच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांनी अतिशय सुरेख आवाजात बुद्ध भीम गीते गायली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत चंदनखेडे यांनी केले. कार्यक्रमाला कमल पाझारे, विमल डापसे, चंद्रकला गेडाम, निता दिवे, पुष्पा घनमोडे, रेखा पाझारे, कांताबाई गजभिये, शशिकला बोरकर, मंजुळाबाई पाटील, माया चंदनखेडे, शोभा भगत, मीरा धवन, सुरेखा गजभिये, इंदू पळवेकर, वैशाली नगराळे, साधना धवन, बंडू लभाने, राहुल चंदनखेडे, वैभव गजभिये यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अविनाश बोरकर, वैभव गजभिये, राहुल चंदनखेडे, हरीश गरपाल यांनी सहकार्य केले. 


No comments:

Powered by Blogger.