Latest News

Latest News
Loading...

सुवर्ण वस्तू व रोख रक्कम असलेली प्रवासी महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने केली लंपास

बस मधील प्रवाशांची झडती घेतांना पोलिस 
प्रशांत चंदनखेडे वणी 

एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मुद्देमालावर हात साफ करणाच्या घटना प्रचंड वाढल्या असून बसस्थानकांवर प्रवाशांच्या वेशात चोरट्यांचा संचार वाढला असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लंपास करणारी टोळीच बस्थानकांवर सक्रिय असल्याचे एसटी बसमधील वाढत्या चोरीच्या घटनांवरून पाहायला मिळत आहे. एसटी महामंडळाच्या चंद्रपूर पांढरकवडा बसने प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या हॅन्ड बॅग मधून चोरट्यांनी सुवर्ण वस्तू व रोख रक्कम असलेली छोटी पर्स लंपास केल्याची घटना २० मे ला दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास घडली. हॅन्ड बॅग मधून सुवर्ण वस्तू व रोख रक्कम ठेऊन असलेली छोटी पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने बस पोलिस स्टेशनला घेण्यास सांगितले. त्यामुळे चालकाने बस सरळ वणी पोलिस स्टेशनला आणली, व पोलिसांना प्रवाशांची झडती घेण्यास सांगितले. पोलिसांनी सर्व प्रवाशांची झडती घेतली, पण चोरी गेलेला मुद्देमाल मात्र मिळून आला नाही. 

पांढरकवडा डेपोची चंद्रपूर-पांढरकवडा ही बस (MH ०७ C ९३२५) चंद्रपूर वरून पांढरकवड्याच्या प्रवासाला निघाली. दरम्यान वरोरा बसस्थानकावरून माया मधुकर कारेकर रा. नेत ता. मारेगाव ही वृद्ध महिला व तिचे कुटुंबीय वणीच्या प्रवासाकरिता बसमध्ये बसले. माया कारेकर या महिलेजवळ असलेल्या हॅन्ड बॅग मधील एका छोट्या पर्समध्ये एक तोळ्याचा सोन्याचा गोफ, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी व अडीच ते तीन हजार रुपये रोख होते. अज्ञात चोरट्याने बसमधील गर्दीचा फायदा घेऊन या महिलेच्या हॅन्ड बॅग मधून सुवर्ण वस्तू व रोख रक्कम असलेली छोटी पर्स अलगद लंपास केली. 

बस पाटाळा गावाजवळ आल्यानंतर हॅन्ड बॅग मधून सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असलेली छोटी पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेला धक्काच बसला. तिने बस सरळ पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितले. बस चालकानेही घटनेचे गांभीर्य ओळखून बस वणी पोलिस स्टेशनला आणली. पोलिसांनी बस मधील सर्व प्रवाशांची झडती घेतली. पण चोरीला गेलेला मुद्देमाल मात्र मिळून आला नाही. वरोरा बसस्थानकावरच बसमध्ये चढतांना चोरट्यांनी सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम असलेली पर्स लंपास केली असावी, असा अंदाज बांधून वणी पोलिसांनी महिलेला वरोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास सांगितले. वृत्त लिहीस्तोवर वरोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया बाकी होती.  


No comments:

Powered by Blogger.