Latest News

Latest News
Loading...

अपघातात गंभीर जखमी जखलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी घुग्गुस राज्य महामार्गावरील वागदरा गावाजवळ विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी ट्रकवर आदळल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दशरथ राजकुमार मालेकार (३२) रा. हेटी ता. कोरपना जि. चंद्रपूर असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. २९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला होता. 

वणी घुग्गुस महामार्गावर विरुद्ध दिशेने वणीकडे येणारी दुचाकी (MH २९ W ४४३२) वणी वरून चारगाव चौकीकडे जाणाऱ्या ट्रकवर (MH ३४ BZ ३७४७) आदळली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. चंद्रपूर येथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याने ५ मे ला शेवटचा श्वास घेतला. 

कोरपना तालुक्यातील हेटी या गावचा रहिवाशी असलेला हा युवक मोटारसायकलने महामार्गाच्या विरुद्ध दिशेने वणीकडे येत असतांना वणी वरून चारगाव चौकीकडे जाणाऱ्या कोळसा वाहतुकीच्या ट्रकला त्याची दुचाकी धडकली. धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा पार चेंदामेंदा झाला होता. या अपघातात दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याला व डोक्याला जबर मार लागला होता. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी तत्परता दाखवीत त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. 

मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथे रेफर केले. परंतु प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने चंद्रपूर येथूनही त्याला नागपूर येथे हलविण्यात आले होते. नागपूर येथे उपचार सुरु असतांना त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. ५ मे ला दुपारी ३.५५ वाजता दशरथ मालेकार याने शेवटचा श्वास घेतला. त्याचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत मृतकाचा मोठा भाऊ धनराज राजकुमार मालेकार (३५) याने २८ मे ला वणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.