प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात चोरटयांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या चोरटे नागरिकांच्या मुद्देमालावर हात साफ करू लागले आहेत. शिक्षकाचे दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना ताजी असतांनाच चोरट्यांनी परत तीच शक्कल लढवून एका व्यक्तीची पैसे असलेली पिशवी लंपास केली आहे. दुचाकीने आलेले हे चोरटे रोख रक्कम असलेली पिशवी हिसकावून सुसाट पळाले. विशेष म्हणजे दोन्ही चोरट्यांनी हेलमेट घातले होते. ही घटना सोमवार दि. २६ मे ला दुपारी १२.१० वाजताच्या सुमारास टिळक चौक ते खाती चौक रस्त्यावरील माळीपुरा जवळ घडली.
चोरट्यांनी यावेळीही सेम शक्कल लढविली. काही पैसे खाली टाकून एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या दुचाकी धारकाला तुमचे पैसे खाली पडले असल्याचा बनाव केला. सदर व्यक्ती खाली पडलेले पैसे उचलत असतांनाच त्याच्या दुचाकीच्या पेट्रोल टॅंक वरील लेदरच्या बॅगेत ठेऊन असलेली पैशाची पिशवी हिसकावून चोरटे दुचाकीने सुसाट पळाले. पैसे ठेऊन असलेली पिशवी हिसकावून पळणाऱ्या चोरट्यांना रोखण्याचा त्या व्यक्तीने प्रयत्न केला. पण दुचाकीने ते धूम स्टाईल पळाले. चोरट्यांनी स्वतःच पैसे खाली टाकून आपल्याला गंडविल्याचे त्या व्यक्तीच्या नंतर लक्षात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह येथील रहिवाशी असलेले श्रीराम आनंदराव लेडांगे (५६) यांनी शहरातील एका बँकेतून १ लाख रुपये कर्ज उचल्यानंतर ते गावी परतत असतांना चोरट्यांनी त्यांना ठगवुन दुचाकीच्या पेट्रोल टॅंक वरील बॅगेत ठेऊन असलेली पैशाची पिशवीच पळविली.
चोरट्यांनी पैसे ठेऊन असलेली पिशवी हिसकावून पळ काढल्यानंतर सदर व्यक्तीने सरळ पोलिस स्टेशनला धाव घेतली. अज्ञात चोरट्यांनी पैसे असलेली पिशवी हिस्कावाल्याची तक्रार त्यांनी पोलिस स्टेशनला नोंदविली. श्रीराम लेडांगे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीवर आलेल्या दोन्ही चोरट्यांनी हेलमेट घातले होते. हे चोरटे सदर व्यक्तीवर पाळत ठेऊन असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी त्या व्यक्तीला गंडा घालून आपला चोरीचा डाव साधल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे.
चार दिवसांपूर्वी एका शिक्षकालाही अशाच प्रकारे गंडविण्यात आले होते. बँकेतून पैसे विड्रॉल केल्यानंतर पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन दुचाकी सुरु करून घराकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकाला तुमचे पैसे खाली पडले असल्याचा बनाव करून चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास केले होते. ही घटना ताजी असतांनाच परत चोरट्यांनी तीच शक्कल लढवून बँकेतून कर्ज उचलून गावाकडे परतणाऱ्या श्रीराम लेडांगे यांची पैसे ठेऊन असलेली पिशवी लंपास केली. त्यामुळे चोरटे नागरिकांना गंडविण्यात तरबेज झाले असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी डोळ्यासमोर पैसे असलेली पिशवी हिसकावून पळ काढल्याने भयभीत झालेल्या व्यक्तीने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: