प्रशांत चंदनखेडे वणी
राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करणारं सर्वपरिचित व्यक्तीमत्व मोरेश्वरभाऊ उज्ज्वलकर व त्यांचे सुपुत्र आदित्य मोरेश्वर उज्ज्वलकर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ! मितभाषी, मनमिळाऊ, सुस्वभावी व स्वभावगुणांचा खजिना असलेल्या मोरेश्वरभाऊ उज्ज्वलकर व आदित्य उज्ज्वलकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
शुभेच्छुक :- मोरेश्वर उज्ज्वलकर मित्र परिवार वणी विधानसभा क्षेत्र
मोरेश्वर राघोबाजी उज्ज्वलकर म्हणजे संघर्षातून उभरलेलं व्यक्तिमत्व. संघर्षमय जीवनाच्या वाटेवरून उद्योजक बनण्यापर्यंतचा मार्ग गाठणाऱ्या धेय्याचा प्रवास म्हणजे मोरेश्वर उज्ज्वलकर. गरिबीच्या काळोखाला चिरत आपल्या कर्तबगारीने प्रकाश वाट शोधणाऱ्या धैर्याचं नाव म्हणजे मोरेश्वर उज्ज्वलकर. मोरेश्वर उज्ज्वलकर यांनी हालाकीच्या परिस्थितीतही खचून न जाता परिस्थितीशी संघर्ष केला. जिद्दीने ते एक एक पाऊल पुढे टाकत गेले. गरिबीचे चटके सोसले पण आत्मविश्वास डळमळू दिला नाही. नशिबाने हिरवी झेंडी दाखविली की संघर्षाला यशाची वाट मिळते, असे म्हणतात. मोरेश्वरभाऊंच्या बाबतीतही तसेच घडले.
त्यांनी जिद्दीने सुरु केलेल्या एका छोट्या व्यवसायाने त्यांना प्रचंड उभारी दिली. नंतर त्यांच्या आयुष्यात भरभराटच होत गेली. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास आज परिस्थिती समोर नतमस्तक होणाऱ्या तरुणांपुढे आदर्श बनला आहे. त्यांनी जीवनात केलेला संघर्ष व घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले असून आज त्यांची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ते आता समाजकार्यातही प्रचंड अग्रेसर आहेत. राजकारणातही त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एक अनुभवी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी नुकताच शिवसेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश करून त्याकाळचे दृढ संबंध आजही जपले आहेत. यशस्वी उद्योजक, धडाडीचे समाजकारणी व अनुभवी राजकारणी म्हणून सर्वांनाच परिचित असलेल्या मोरेश्वरभाऊ उज्ज्वलकर यांना त्यांच्या वाढदिवानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
No comments: