प्रशांत चंदनखेडे वणी
मागील पन्नास वर्षांपासून जादू या कलेचे प्रयोग दाखवून या कलेने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे जादूगार डॉक्टर दिलीप अलोणे यांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा गौरव म्हणून राष्ट्रीय जादू परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जादू विश्वामित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही शहरवासीयांसाठी अभिमानास्पद बाब असून शहराच्या सांस्कृतिक इतिहासाचा गौरव वाढविणारी आहे. शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा लाभला असून येथे अनेक कलाकार घडले आहेत. कला विश्वात शहराचं नाव उंचाविण्याचं काम कलाप्रेमींनी केलं आहे.
डॉक्टर दिलीप अलोणे यांनी जादू ही कला संपूर्ण महाराष्ट्राला अवगत केली. मागील पन्नास वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकांणी या कलेचे प्रयोग सादर केले. या केलेने अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जादू कलेला आता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही वणीच्या सांस्कृतिक इतिहासाचा गुणगौरव वाढविणारी बाब आहे.
पुणे येथील उद्योग भवनात पार पडलेल्या आठव्या मायाजाळ जादू संमेलनामध्ये जादूगार डॉक्टर दिलीप अलोणे यांना सन्मानपदक, मानपत्र, शाल श्रीफळ व मुकुट प्रदान करून जादू परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब झोडगे व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जादू महर्षी प्रल्हाद राय, जादूगार नरेंद्र सावंत, जादूगार प्रसाद कुलकर्णी, जादूगार बालाजी कोरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात देशभरातील अडीचशे जादूगारांनी सहभाग घेतला होता
जादूगार डॉक्टर दिलीप अलोणे 1972 पासून म्हणजे शालेय जीवनापासून जादूचे प्रयोग करीत आहेत. आपल्या जादू कलेचे त्यांनी आजवर महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांना आपल्या चित्त थरारक प्रयोगांनी मंत्रमुग्ध केले आहे. डोळ्यावर पट्टी बांधून शहरातील रहदारीच्या मार्गावर मोटरसायकल चालविण्याच्या त्यांच्या प्रयोगाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. पन्नास वर्षे सातत्य टिकवून या कलेचा प्रसार प्रचार करण्यासाठी त्यांनी अनेक शिबिरांचेही आयोजन केले आहे
No comments: