Latest News

Latest News
Loading...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वेकोलि अधिकाऱ्याला दोन वर्षे कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा


प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलित अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने त्याला दोन वर्षे सश्रम कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास त्याला एक महिन्याचा साधा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे. अजित कुमार मिश्रा (४४) रा. परेणा. ता जि. शिवांग (बिहार) हू. मु. भालर असे या शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २०१९ मध्ये घडलेलं हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. या प्रकरणात सरकारी वकिलांनी भक्कमपणे बाजू मांडत आरोपीला पोक्सोच्या गुन्ह्यात शिक्षा घडवून आणली. पांढरकवडा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सातभाई यांनी ३० मे ला प्रकरणाची सुनावणी करतांना प्रदीप मिश्रा याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. 

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलगी ३० सप्टेंबर २०१९ ला शिकवणी वर्गाकरिता जात असतांना वेकोलि अधिकारी प्रदीप मिश्रा याने तिला वाटेत थांबवून अश्लील टिपणी करीत तिचा विनयभंग केला. याबाबत शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. शिरपूरचे तत्कालीन ठाणेदार सतीश चवरे यांनी उत्तमरीत्या तपास करून सादर केलेले दोषारोप पत्र आणि सरकारी अभियोक्ता ऍड. प्रशांत मानकर यांनी या प्रकरणात सबळ पुरावे सादर करून भक्कपणे बाजू मांडल्याने सत्र न्यायाधीश सातभाई यांनी वेकोलि अधिकारी प्रदीप मिश्रा याला पोक्सोच्या गुन्ह्यात दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावास व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. १ लाख रुपये दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास व ५०० दंड ही शिक्षा आरोपीला भोगावी लागणार आहे. 

No comments:

Powered by Blogger.