प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय व मनमिळाऊ व्यक्तीमत्व तथा तडफदार कार्य कर्तृत्व असलेल्या संजय खाडे यांचा शुक्रवार दि. २३ मे ला विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढिवसानिमित्त महिला बचत गट मार्गदर्शन शिबीर आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २३ मे ला सकाळी ११ वाजता जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या कर्मचारी व अभिकर्त्यांकडून वसंत जिनिंग सभागृहात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अतुल इंगळे (नाबार्ड डीडीएम यवतमाळ) यांची उपस्थिती लाभणार आहे. तर कार्यक्रमाचे उद्घाटन वाहतूक उपशाखा वणीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिता वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार निखिल धुळधर, पंचायत समिती वणीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, न.प. वणीचे सहाय्यक मुख्याधिकारी जयंत सोनटक्के, आरसीसीपीएल मुकुटबनचे सीएसआर कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत
सकाळी ११ वाजता खास महिला बचत गटांसाठी आयोजित उद्योजकता प्रशिक्षण शिबिराला सुरवात होईल. यात बचत गटाच्या महिलांना व गृह उद्योग करणाऱ्या महिलांना या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले गणेश आत्राम (पांढरकवडा) हे विशेष मार्गदर्शन करतील. महिलांना उद्योग, कर्ज वाटप, रोजगाराच्या विविध संधी याबाबत या शिबिरातून महत्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर लागेचच रक्तदान शिबिराला सुरवात होईल. संजय खाडे फाउंडेशन द्वारा हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त व गंभीर आजार जडलेल्या रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, या उद्देशाने सामाजिक बांधिलकीतून संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त संजय खाडे फाउंडेशन द्वारा हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments: