Latest News

Latest News
Loading...

अडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी गंगाबाई काटकर यांची निवड

प्रशांत चंदनखेडे वणी 

झरीजामणी तालुक्यातील अडेगाव ग्रामपंचायतीचा सरपंच अपात्र ठरल्याने नवीन सरपंचाची निवड करण्याकरिता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत शेवटी शिवसेना पक्षाच्या (उबाठा) गंगाबाई एकनाथ काटकर यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली. गंगाबाई काटकर यांच्या विजयानंतर शिवसेनेकडून प्रचंड जल्लोष करण्यात आला. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व किरण देरकर यांनी नवनिर्वाचित सरपंच गंगाबाई काटकर यांचा सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलं. अडेगाव ग्रामपंचायतीचे आघाडीचे सदस्य संजय आत्राम, वंदना पेटकर, निर्मला पानघाटे व संचिता आसुटकर हे गंगाबाई काटकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला. या चार सदस्यांच्या पाठिंब्यामुळेच गंगाबाई काटकर या सरपंच पदाच्या मानकरी ठरल्या आहेत.  

अडेगाव ग्रामपंचायतीचा सरपंच अपात्र ठरल्याने ग्रामपंचायत सरपंचाची जागा रिक्त होती. या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अखेर गंगाबाई काटकर यांनी बाजी मारली. गंगाबाई काटकर या अडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच बनल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एवढेच नाही तर आमदार संजय देरकर व किरण देरकर यांनी सुद्धा नवनिर्वाचित सरपंच गंगाबाई काटकर यांचा सत्कार केला. यावेळी सिताराम पिंगे, मंगेश पाचभाई, अभय पानघाटे, जगन जुनगरी, विनोद घुमे आदी उपस्थित होते. 

No comments:

Powered by Blogger.