Latest News

Latest News
Loading...

उधारीचे पैसे परत मागितल्याने बियरची बॉटल तोंडावर मारून केले जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

उधार दिलेल्या पैशावरून झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याला बियरची बॉटल तोंडावर मारून जखमी केल्याची घटना प्रेमनगर परिसरात १४ जूनला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर युवकावर गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादी संदीप क्रिष्णय्या चिलूकला (५२) हा मूळचा हैद्राबाद येथील रहिवाशी असून तो हल्ली शहरातील रविनगर येथे परिवारासह राहतो. रवि नगर येथेच राहणाऱ्या हरीश नामक युवकाशी त्याची ओळख झाली. दोघेही रविनगर येथेच राहत असल्याने झालेल्या ओळखीतून संदीपने हरीशला ५ हजार रुपये उधार दिले. मात्र नंतर हरीश हा संदीपला पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागला. २२ मे ला उधार घेतलेले पैसे परत करण्यास तो चालढकल करू लागल्याने संदीपने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला. अशातच संदीपची हरीशच्या पत्नीशी भेट झाली. तिने हरीश हा प्रेमनगर परिसरात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान संदीप हा दारूच्या नशेत तर्रर्र होऊन प्रेमनगर परिसरात आला. 

तेंव्हा संदीपने त्याला उधार घेतलेले पैसे कधी परत करतो, असे म्हणताच हरीशने सरळ बियरची बॉटल संदीपच्या तोंडावर मारली. त्यामुळे संदीपच्या गालाला व ओठाला जबर दुखापत होऊन त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. तसेच यानंतर परत पैसे मागितले तर जीवानिशी ठार कारेन अशी धमकीही हरीशने संदीपला दिली. त्यामुळे संदीपने झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी हरीशवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.