Latest News

Latest News
Loading...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आशा पल्लवीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणुकीचा मार्ग मोकळा

प्रशांत चंदनखेडे वणी 

अनेक वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिल्याने निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना शासन आदेशाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

मागील तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. वणी नगरपालिकेचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये संपला. तेंव्हा पासून नगर पालिकेचा कारभार प्रशासक पाहत आहेत. मात्र आता लवकरच नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने नगर पालिकेवर लोकप्रतिनिधींची सत्ता येणार आहे. लोकांना त्यांच्या हक्काचे प्रतिनिधी मिळणार आहेत. नगर पालिकेचे सभागृह परत लोकप्रतिनिधींनी गजबजून उठणार आहे. इच्छुकांची चातकासारखी सुरु असलेली प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे.

मागील तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार लोकप्रतिनिधी विना चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक लढविण्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांची निवडणूका सतत लांबणीवर जात असल्याने मोठी हिरमुस होत होती. अनेक इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे टक लावून बसले होते. त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने मोठा दिलासा मिळाला आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चातकासारखी वाट पाहत असलेल्या इच्छुकांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आनंदाचे भरते आले आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच शासनाकडून स्थानिक स्वराज संस्थांना परिपत्रक जाहीर करून विहित कालावधीत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

वणी नगर पालिकेचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये संपला. तेंव्हा पासून नगर पालिकेची निवडणूकच झाली नाही. नगर पालिकेवर प्रशासक राज असून नगर पालिकेचे प्रशासक म्हणून तहसीलदार निखिल धुळधर हे नगर पालिकेच्या कारभाराचा गाडा हाकत आहे. जवळपास तीन ते चार वर्षांपासून नगर पालिकेचे सभागृह बरखास्त झाले आहे. लोकप्रतिनिधी विना नगर पालिकेचा कारभार सुरु आहे. वार्डातील नागरिकांना हक्काचे प्रतिनिधीच नसल्याने वार्डातील समस्या कुणाकडे मांडाव्या हा प्रश्न त्यांच्यापुढे सातत्याने निर्माण होत आहे. परंतु आता वार्ड वासियांना हक्काचे प्रतिनिधी मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

नगर पालिकेच्या विस्तारीकरणामुळे शहरात आता १४ प्रभाग होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे नगर पालिकेवर निवडून जाणाऱ्या सदस्यांची संख्याही वाढणार आहे. प्रभाग निहाय आरक्षण व निवडणुकीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होणार असल्याचे सूतोवाच करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यास उतावीळ असलेले हौसे गौसे आता वार्डांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी गाठी घेतांना दिसत आहेत. नगर पालिकेची यापूर्वीची निवडणूक २८ नोव्हेंबर २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला. तेंव्हा पासून नगर पालिकेचा कारभार लोकप्रतिनिधी विना सुरु आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नगर पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून नगर पालिकेत लवकरच लोकांमधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींची रेलचेल पाहायला मिळणार आहे. 

No comments:

Powered by Blogger.