Latest News

Latest News
Loading...

शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतरच शेत पिकांच्या नुकसानीचा अहवाल तयार करावा : आमदार संजय देरकर

प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलिच्या कोळसा उत्पादन व वाहतुकीमुळे उडणाऱ्या कोळशाच्या धुळीने शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी व अहवाल तयार करण्याकरिता शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीचे व वेकोलिच्या कोळसाखाणग्रस्त समितीचे अध्यक्ष विकास खरगे यांची वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धूळ प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतरच अहवाल तयार करण्यासंदर्भात निवेदन दिले. 

वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कोळसाखाणीतील कोळसा उत्पादन व वाहतुकीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळसाखाणीतील कोळसा उत्पादन व वाहतुकीमुळे कोळशाची प्रचंड धूळ उडत असल्याने कोळसाखाण परिसर व रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत. कोळसा उत्पादन व वाहतुकीमुळे होणाऱ्या धूळ प्रदूषणाने शेतातील पिकं पूर्णतः उध्वस्त झाल्याने शेतकरी कमालीचे संकटात सापडले आहेत. 

कोळसा वाहतुकीमुळे उडणारी धूळ शेत पिकांवर साचून राहत असल्याने शेतातील पिकं पूर्णपणे उद्धवस्त होत आहेत. वेकोलिच्या कोळसा वाहतुकीचा रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. कोळसा वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीने शेत पिकं उध्वस्त होऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतीच्या मशागतीवर व पिकांच्या लागवडीवर होणारा खर्च पूर्णतः व्यर्थ जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. वेकोलिच्या धूळ प्रदूषणामुळे शेत पिकांबरोबरच शेतीच्या उत्पादन क्षमतेतही प्रचंड घट झाली आहे. कोळशाच्या रसायन मिश्रित धुळीमुळे शेतीची सुपीकताही घटली आहे. त्यामुळे खाणबाधित क्षेत्रातील शेतकरी प्रचंड विवंचनेत आला आहे. 

वेकोलिच्या कोळसा उत्पादन व वाहतुकीमुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी वेकोलि विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी धूळ प्रदूषणाने नुकसान झलेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई मिळावी म्हणून वेकोलि व प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. वेकोलि प्रशासन, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली. एवढेच नाही तर लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले. त्यामुळे शासनाने ८ जूनला आदेश काढून वेकोलिच्या धूळ प्रदूषणामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी करण्याकरिता समिती गठीत केली. 

या अभ्यास समितीचे अध्यक्ष तथा वेकोलिच्या कोळसाखाणग्रस्त समितीचे अध्यक्ष असलेले विकास खरगे यांची आमदार संजय देरकर यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी वेकोलिच्या धूळ प्रदूषणामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे अहवाल तयार करतांना प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करावी, अशी ठाम भूमिका मांडली. वस्तुनिष्ठ व पारदर्शकपणे शेतींचे निरीक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, केवळ कागदोपत्री नोंद घेऊन शेत पिकांच्या नुकसानीचे अहवाल तयार करू नये, अशी भूमिका मांडतानाच आमदार संजय देरकर यांनी विकास खरगे यांना यासंदर्भात निवेदनही दिले.



No comments:

Powered by Blogger.