Latest News

Latest News
Loading...

शहरातील प्रसिद्ध फोटोग्राफर सोमू उर्फ सतिश बिलोरिया यांचं व्ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहरातील प्रसिद्ध फोटोग्राफर व दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले सतिश रमेश बिलोरिया यांचे बुधवार २५ जूनला दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास व्ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४४ वर्षाचे होते. शहरात ते सोमू या नावाने ओळखले जायचे. सारिका फोटो स्टुडिओचे संचालक असलेले सोमू उर्फ सतिश बिलोरिया यांचं असं अचानक निधन झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. सर्वांशी सलोखा जपणारे सोमू अचानक सर्वांना सोडून निघून गेल्याने मित्र परिवार व आप्तस्वकीय शोक सागरात बुडाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबं पोरकं झालं आहे. 

प्रकृती ठणठणीत असतांना त्यांना अचानक दुपारी जेवणानंतर अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना लगेच शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना व्ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला, आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकल्पीत निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार व मुलाच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं आहे. सोमू उर्फ सतिश बिलोरिया यांच्या अकाली निधनाने मित्र परिवारही शोकमग्न झाला आहे. त्यांच्या पश्च्यात आई वडील, पत्नी, मुलगा असा आप्त परिवार आहे. गुरुवार २६ जूनला लक्ष्मीनारायण अपार्टमेंट येथील त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंतयात्रा निघणार आहे. मनमिळाऊ, सुस्वभावी व मितभाषी असलेले सोमू उर्फ सतिश हे अचानक सर्वांना सोडून गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 


No comments:

Powered by Blogger.