Latest News

Latest News
Loading...

दारुड्या पतीने पत्नीच्या डोक्यावर दगड मारून केले जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

दारुड्या पतीने पत्नीच्या डोक्यावर दगड मारून जखमी केल्याची घटना मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर या गावात २४ जूनला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पत्नीने पोलिस स्टेशनला नोंदविलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर या गावात राहणारा भिमराव महादेव आत्राम (३५) हा दारूचा प्रचंड व्यसनी असून तो दारू पियुन घरी आला की पत्नीशी नेहमी वाद घालतो. आणि तिला विनाकारण मारहाण करतो. २४ जुनलाही दुपारी १२ वाजता सवई प्रमाणे तो दारू ढोकसून घरी आला. त्यावेळी त्याची पत्नी प्रेमीला ही घरी होती. त्यांच्या दोन मुलीही घरातच खेळत होत्या. दारूच्या नशेत तर्रर्र होऊन आलेल्या भिमरावने लहान मुलीला (१ वर्ष) धक्का दिल्याने ती जमिनीवर पडली, आणि रडायला लागली. त्यामुळे पत्नी प्रेमीलाने मुलीला धक्का का मारला असा प्रश्न केला. त्यावर दारुड्या भिमरावने पत्नीलाच शिवीगाळ करीत तिच्याशी वाद घातला. तसेच हातातील दगड पत्नीच्या डोक्यावर मारून तिला जखमी केले. पत्नीने त्याला विनाकारण मारहाण का करतोस, असे विचारले असता त्याने एखाद दिवशी तुला जिवानिशीच ठार मारतो, अशी तिला धमकी दिली.  

भिमराव आत्राम याच्याशी लग्न झाल्यापासून प्रेमीला त्याच्या दारूच्या व्यसनामुळे प्रचंड त्रस्त आहे. ती स्वतः रोजमजुरी करते. भिमराव हा सांसारिक जीवनाची जबाबदारी पार पाडण्याऐवजी दारूच्या नशेत तर्राट झालेला असतो. दारूच्या नशेत तर्रर्र होऊन तो घरी येतो. आणि पत्नीशी वाद घालून तिला मारहाण करतो. चिमुकल्या मुलींचीही तो किमया करीत नाही. दारूच्या प्रचंड आहारी गेलेल्या भिमरावने २४ जूनला दुपारी १२ वाजता पत्नीशी जोरदार वाद घातला व तिच्या डोक्यावर दगड मारून तिला जखमी केले. पतीच्या वारंवार मारहाण करण्याने त्रस्त झालेल्या पत्नीने शेवटी पती विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. प्रेमीला आत्राम हिच्या तक्रारी वरून पोलिसांनी भिमराव आत्राम याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.  

No comments:

Powered by Blogger.