Latest News

Latest News
Loading...

शाळा व पेट्रोल पंप जवळजवळच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत व्यक्त होत आहे चिंता

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी घुग्गुस मार्गावरील मंदर गावाजवळ खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा व पेट्रोल पंप जवळजवळच असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एक तर आधीच ही शाळा मुख्य महामार्गालगत आहे. आणि त्यातच पेट्रोल पंपही शाळेजवळच असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक मानल्या जात आहे. पेट्रोल पंपामध्ये ज्वलनशील पदार्थाची साठवणूक व त्याची विक्री करण्यात येते. त्यामुळे येथे एखादा दुर्दैवी प्रसंग घडल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोल पंपवर पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता वाहनांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे पेट्रोल पंपवर कोणते वाहन कधी येईल व जाईल याचाही नेम नसतो. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये नेहमी भीतीचे वातावरण निर्माण झालेले असते. पेट्रोल पंपाचा पर्यावरणावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याने तीही एक चिंता निर्माण झालेली असते. त्यामुळे पेट्रोल पंप व शाळा जवळजवळच असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. 

मंदर ग्रामपंचायत हद्दीत अगदीच मुख्य महामार्गालगत पोद्दार लर्न स्कुल ही खाजगी इंग्रजी माध्यमिक शाळा आहे. आणि या शाळेजवळच नायरा पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंप व शाळा जवळजवळच असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहे. ज्वलनशील पदार्थाची विक्री होणाऱ्या इंधन पंपामुळे शाळा व विद्यार्थ्यांना नेहमी धोका निर्माण झालेला असतो. इंधन पंपामुळे पर्यावर्णावरही प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे शाळा व रुग्णालयाजवळ पेट्रोल पंप असणे धोकादायक मानले जाते. पोद्दार शाळेजवळ असलेल्या पेट्रोल पंपमुळे येथे शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नायरा पेट्रोल पंप व पोद्दार स्कुल जवळजवळच असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला घेऊन आता नागरिकांमधून खुल्या आवाजात प्रश्न उपस्थित केले जात आहे. 


No comments:

Powered by Blogger.