Latest News

Latest News
Loading...

"एक पेड माँ के नाम" उपक्रमांतर्गत न.प. वणी द्वारा शाळा क्रं. ७ येथे वृक्षारोपण


प्रशांत चंदनखेडे वणी 

दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या विद्यमाने तथा नगर परिषद वणी द्वारा जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माझी वसुंदरा अभियानातंर्गत "एक पेड माँ के नाम" हा उपक्रम राबवून शाळा क्रमांक ७ येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार संजय देरकर व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच न.प. मुख्याधिकारी सचिन गाडे, उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी देखील या वृक्षारोपण कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली. मान्यवरांच्या उपस्थितीत येथे वृक्षारोपण करण्यात आले. 

या वृक्षारोपण कार्यक्रमात क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर, सोनाली तिवारी, वृनाली मस्के, दुर्गा विरूळकर, दक्ष भोजाजी महाराज आणि रिया बचत गटाच्या महिलांनी सक्रिय सहभाग घेतला. वृक्षरोपणानंतर झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी या महिलांनी घेतली. 

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार, विजय चव्हाण, दिगांबर ठाकरे, न. प. विभाग प्रमुख वनपाल विजय पोटे, पंकज येवले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळा स्तरावर हा कार्यक्रम राबविण्यात आला. 

न.प. मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या मार्गदर्शनात दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग प्रमुख पौर्णिमा शिरभाते, नोडेल अधिकारी जयंत सोनटक्के, उत्तम हापसे, विनोद मनवर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले. 


No comments:

Powered by Blogger.