आत्महत्येची धमकी देऊन निर्माण केले शारीरिक संबंध, नंतर नको त्या अवस्थेतील फोटो व व्हिडीओ केले सोशल मीडियावर वायरल
प्रशांत चंदनखेडे वणी
एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधणाऱ्या तरुणाने नंतर तिला आत्महत्या करण्याची भीती दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल करून तिची बदनामी करणाऱ्या तरुणाविरुद्ध पीडित तरुणीने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी तरुणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला २४ वर्षीय तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमाच्या आणाभाका घेऊन तिच्याशी जवळीक साधली. तिला आमिषे प्रलोभने दिली. तिच्याशी लग्न करण्याची तयारीही दर्शविली. तरीही ती शारीरिक संबंध ठेवण्यास तयार होत नसल्याचे पाहून त्याने आपली हवस भागविण्याकरिता तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्याच्या आत्महत्या करण्याच्या भीती पोटी ती त्याच्यापुढे नमली. तरुणाने याचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या काळात तरुणाने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून तिच्याकडून आपली वासना भागवून घेतली.
मात्र या दरम्यान त्याने तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ चित्रीकरण केले. विवस्त्र व नको त्या अवस्थेतील तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य या नराधमाने केले. तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून नंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल करून तिची समाजात बदनामी करणाऱ्या द्वेष बुद्धीच्या तरुणाविरुद्ध पीडित तरुणीने अखेर १७ जून २०२५ ला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. तरुणीच्या तक्रारी वरून पोलिसांनी रोशन विठ्ठल गोबाडे (२४) रा. नांदेपेरा तालुका वणी या आरोपीवर बीएनएसच्या कलम 354(c), 376(2), सहकलम 3(1), 4,5(1), 6, 11(5), 65(E), 67(B), IT Act व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: