Latest News

Latest News
Loading...

प्रबोधन कार्यशाळेतुन करण्यात आलं सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकण्याबाबत मार्गदर्शन


प्रशांत चंदनखेडे वणी 

राजूर विकास संघर्ष समितीच्या माध्यमातून राजूर येथे दर आठवड्याला प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात येते. या कार्यशाळेतुन विविध विषयावर मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात येते. या आठवड्यात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत इंग्रजी सोप्या पद्धतीने अशी शिकता येईल, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. इंग्रजी बद्दल मनात घर करून असलेली भिती दूर करण्याकरिता यावेळी प्रबोधन कार्यशाळेत इंग्रजीचा क्लास घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या राजेंद्र पुडके यांनी इंग्रजी बद्दलचा न्यूनगंड दूर करण्याकरिता सरळ व सोप्या पद्धतीने इंग्रजी कशी शिकता येईल, याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. 

राजूर विकास संघर्ष समिती ही मागील दहा वर्षांपासून जनतेचे हक्क व गावाचा विकास यावर निरंतर कार्य करीत आहे. तर्कशील व विवेकवादी विचार माणसात रुजावे आणि माणूस वैचारिक संपन्न असा देशाचा जबाबदार नागरिक बनवा या उद्देशाने दर आठवड्याला राजूर येथे विविध विषयांवर प्रबोधन कार्यशाळा घेतली जाते. त्यानुषंगाने या आठवड्यात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टिकोनातून प्रबोधन कार्यशाळेत इंग्रजी बद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनात असलेली इंग्रजी बद्दलची भिती दूर व्हावी, तसेच त्यांना सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकता यावी, याकरिता या आठवड्यातील प्रबोधन कार्यशाळेत इंग्रजी शिकवणीचा विशेष वर्ग घेण्यात आला. इंग्रजीचे अभ्यासक असलेले राजेंद्र पुडके यांनी इंग्रजी सोप्या पद्धतीने कशी शिकता येईल याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. 

या कार्यशाळेला वणी वकील संघाचे उपाध्यक्ष यशवंत बरडे, अशोक भगत, विजय तोताडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपापले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. कुमार मोहरमपुरी यांनी केले. संचालन महेश लिपटे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल कुंभारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुनिल सातपुते, विनायक येसांबरे, अक्षांत मोहरमपुरी यांनी सहकार्य केले.  

No comments:

Powered by Blogger.