विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवणे महिलेच्या चांगलेच आले अंगलट, फेसबुक फ्रेंडने महिलेचा नग्न अवस्थेत बनविला व्हिडीओ
प्रशांत चंदनखेडे वणी
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणाऱ्या युवकाला प्रतिसाद दिल्यांनतर फोनवर वार्तालाप करणाऱ्या एका विवाहित महिलेची त्या युवकाने नग्न अवस्थेतील चित्रफीत तयार करून ती दुसऱ्याच्या मोबाईलवर पाठविली. त्यानंतर त्याने त्या विवाहित महिलेला त्याच्याशी संबंध न ठेवल्यास ती नग्न अवस्थेतील चित्रफीत नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीने भयभीत झालेल्या महिलेने याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ जूनला सायंकाळी ६.१७ वाजता समोर आली.
शहरालगत असलेल्या एका गावातील विवाहित महिलेला मोमीनपुरा येथील रहिवाशी असलेल्या युवकाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. महिलेने त्याच्या फ्रेंड रिक्वेस्टला प्रतिसादही दिला. त्यानंतर त्यांच्यात फोनवर वार्तालाप सुरु झाला. हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही विवाहित महिला अलगद या फेसबुक फ्रेंडच्या प्रेमात पडली. फोन वरील संवादातून ते नंतर एवढे जवळ आले की, त्याने तिला नग्न अवस्थेत बघण्याची इच्छा जाहीर केली. तिने नग्न अवस्थेत मोबाईलवर व्हिडीओ कॉल करण्यास नकार दिला तर त्यांच्यातील प्रेमसंबंध त्याने तिच्या नवऱ्याला सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे भीती पोटी तिने त्याला नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल केला. मात्र त्याने तिची त्या अवस्थेतील व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ती दुसऱ्याच्या मोबाईलवर पाठविली.
नंतर त्या युवकाची इच्छा वजा हिंमत वाढतच गेली. त्याने नंतर तिला त्याच्याशी संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. तिने त्याच्याशी संबंध ठेवले नाही तर तिचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ तिच्या नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली. त्यामुळे ही महिला प्रचंड धास्तीत आली. त्याच्या नेहमीच्या धमक्यांना कंटाळून अखेर तिने त्याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. विवाहित महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी वाजिद हुसैन (३९) रा. मोमीनपुरा याच्यावर बीएनएसच्या कलम ७५, ७७, ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. लग्न झालेले असतांना विवाहबाह्य प्रेमसंबंध ठेवणे महिलेच्या चांगलेच अंगलट आले. प्रेमसंबंधात नग्न होण्यापर्यंतची वेळ तिच्यावर आली. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: