Latest News

Latest News
Loading...

दुचाकी विक्रीसाठी ग्राहक शोधणाऱ्या चोरट्याच्या शिरपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या


प्रशांत चंदनखेडे वणी 

चोरी केलेल्या मोपेड दुचाकीच्या विक्रीसाठी ग्राहक शोधत असलेला चोरटा शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला चोरीच्या दुचाकीसह रंगेहात अटक केली. गोपाल महादेव तुमराम (२८) रा. शेवाळा ता. वणी असे या पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे.

शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतून मोपेड दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्याच्या शिरपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. १८ जूनला पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालणाऱ्या ठाणेदार माधव शिंदे यांना मोपेड दुचाकीची चोरी करणारा चोरटा दुचाकीच्या विक्री करीता ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार माधव शिंदे यांनी सपोनि रावसाहेब बुधवंत व पोहवा प्रशांत झोड यांना चोरटा ग्राहक शोधत असलेल्या ठिकाणी पाठविले. त्यांनी त्याठिकाणी जाऊन चोरट्याचा शोध घेतला असता त्यांना तेथे चोरटा गवसला. त्यांनी दुचाकीसह चोरट्याला ताब्यात घेतले. 

गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो ठाणेदार माधव शिंदे यांच्या कार्यवाही पासून वाचणे शक्य नाही. गुन्हेगारांचा शोध लावण्याच्या कौशल्यामुळे त्यांनी कित्येक अट्टल गुन्हेगारांना तुरुंगवारी घडविली आहे. तपासाची योग्य दिशा आणि स्ट्रॉंग खबरी नेटवर्क यामुळे त्यांनी बिळात लपून बसलेले गुन्हेगारही शोधून काढले आहेत. दुचाकी चोरटा दुचाकी विक्री करीता ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळताच त्यांनी सपोनि रावसाहेब बुधवंत यांच्यासह एका पोलिस कर्मचाऱ्याला पाठवून त्याच्या मुसक्या आवळल्या. या कार्यवाहीत त्यांनी एक मोपेड दुचाकी (MH २९ BP ०२८७) किंमत ४० हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गोपाल तुमराम या दुचाकी चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, सपोनि रावसाहेब बुधवंत, पोहवा प्रशांत झोड, सुनिल दुबे, पोकॉ मंगेश सलाम यांनी केली. 

No comments:

Powered by Blogger.