प्रशांत चंदनखेडे वणी
ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यांनी मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामीण जनतेतून तीव्र संताप व्यक्त होतांना दिसत आहे. पावसामुळे तर ग्रामीण रस्ते आणखीच बिकट झाले आहेत. या रस्त्यांनी वाहने चालविणे अतिशय कठीण झाले आहे. दीपक चौपाटी पासून गोकुळ नगर मार्गे व्हिनर्स बियरबार जवळून लालगुडा गावाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची तर फारच गंभीर अवस्था झाली आहे. हा रस्ता वाहने चालविण्यायोग्य तर राहिलेलाच नाही. पण या रस्त्याने पायदळ जाणे देखील कठीण झाले आहे. या प्रमुख रस्त्याची पांदण रस्त्यापेक्षाही वाईट अवस्था झाली आहे. पावसामुळे हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता पूर्णतः खड्ड्यांनी व्यापला आहे. संततधार पावसामुळे या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले. लालगुडा गावाकडे जाणाऱ्या या प्रमुख मार्गाची अत्यंत गंभीर अवस्था झालेली असतांनाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने लालगुडा गाववासीयांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची फारच गंभीर अवस्था झाली आहे. रस्त्यांनी मार्गक्रमण करणे कठीणच नाही तर अशक्यप्राय झाले आहे. रस्त्यावरील खड्डे आता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने खड्ड्यांचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांनी वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे झाले आहे. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकल चालकांचे संतुलन बिघडून कित्येक छोटे मोठे अपघातही झाले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची मागणी होऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यांनी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांची झालेली दुरावस्था उघड्या डोळ्याने दिसत असतांनाही रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे या रस्त्यांनी मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
लालगुडा गावाकडे जाणारा रस्ता तर मार्गक्रमण करण्यायोग्यच राहिला नसल्याचे पाहायला मिळत आहे. या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. पांदण रस्त्यापेक्षाही दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला आहे. या प्रमुख रस्त्याला तलावाचे स्वरूप आले असून हा रस्ता पूर्णतः जलमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने मोटारसायकलचा प्रवास तर बंद झालाच आहे. पण या रस्त्याने गावकऱ्यांचे पायदळ जाणेही कठीण झाले आहे. प्रमुख रस्त्यावर तळे साचल्याने गावकऱ्यांना लांबचे अंतर कापून गावाकडे जावे लागत आहे. गावाकडे जाणारा साधा सोपा व सरळ मार्ग मार्गक्रमणायोग्य राहिला नसल्याने गावकऱ्यांना लांब अंतर पार करून गाव गाठावे लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
लालगुडा गाववासीयांचा मार्गक्रमणाचा हा प्रमुख रस्ता असतांनाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे गरजेचे असतांना या रस्त्याला दुर्लक्षित ठेवले जात आहे. लालगुडा गावाकडे जाणारा हा प्रमुख रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून या रस्त्याने मार्गक्रमण करतांना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याने मार्गक्रमण करणेही कठीण होत असल्याने नागरिकांना गावाकडे जाण्याकरिता मोठा फेरा मारून जावे लागते. गावाकडे जाणारा सरळ व सोपा मार्ग दुरुस्ती अभावी मार्गक्रमण करण्यायोग्य न राहिल्याने नागरिकांना गावाकडे जातांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाची मागणी आता जोर धरू लागली आहे.
No comments: